शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबातील गावे कशी हटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:55 IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानतळोदी, पळसगाव व कोळसा या गावांचे स्थलांतरण कसे कराल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला करून यावर १८ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : सरकारला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानतळोदी, पळसगाव व कोळसा या गावांचे स्थलांतरण कसे कराल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला करून यावर १८ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.२००८ मध्ये न्यायालयाने वने व वन्यप्राण्यांच्या संवर्धनाकरिता स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. त्या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकेचे कामकाज पाहणारे न्यायालय मित्र वरिष्ठ वकील सी. एस. कप्तान यांनी रानतळोदी, पळसगाव व कोळसा या गावांना वनांच्या बाहेर स्थलांतरित करण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर स्पष्टीकरण देताना सरकारी वकील एन. आर. राव यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार स्थलांतरासाठी आधी गावकऱ्यांनी त्यांच्या पसंतीचे ठिकाणी सांगणे आवश्यक असल्याची व त्यानंतरच राज्य सरकार आवश्यक कार्यवाही सुरू करू शकत असल्याची माहिती दिली. सरकारच्या या मोघम स्पष्टीकरणाने न्यायालयाचे समाधान झाले नाही. स्थलांतरणासाठी पसंतीचे ठिकाण सांगण्याची संधी मिळणे म्हणजे स्थलांतरण टाळण्याचा पर्याय होत नाही. हे प्रकरण गेल्या १० वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. ते पाहता गावकरी दुसरीकडे स्थलांतरित होण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे राज्य सरकारनेच गावे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करावी व ही गावे चार महिन्यांत कशी स्थलांतरित होतील यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्यात यावे, असे न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प