महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार यावर्षी १४ नाेव्हेंबर राेजी दिवाळीच्या दिवशी ६६.५ डीबीए ध्वनीच्या स्तराची नाेंद करण्यात आली. मागील वर्षी दिवाळीला २७ ऑक्टाेबर राेजी रात्री ६३ डीबीए ध्वनी स्तराची नाेंद करण्यात आली हाेती. यावरून मागील वर्षीपेक्षा यावेळी प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र यापूर्वी नीरीने यावर्षी फटाके कमी फुटल्याने प्रदूषण घटल्याचा दावा केला हाेता. नीरीच्या उलट प्रदूषण मंडळाने ध्वनिप्रदूषणाचे आकडे जाहीर केले आहेत. शहरात वाहतूक, उद्याेग आणि सुरू असलेल्या बांधकामामुळे प्रदूषण वाढल्याचे कारण मंडळाने दिले आहे. मात्र हे तिन्ही फॅक्टर मागील वर्षीही हाेतेच. अशावेळी ध्वनिप्रदूषणात वाढ कशी झाली, हा चर्चेचा विषय आहे. कारण यावर्षी लाॅकडाऊननंतर अद्यापही बराेबर उद्याेग सुरू झाले नसून रात्री ते सुरू राहत नाही. वाहतूकही पूर्वीप्रमाणेच आहे. शिवाय रात्रीच्या वेळी बांधकामही पूर्वीप्रमाणे सुरू राहत नाही. त्यामुळे मंडळाच्या आकड्यांवर पर्यावरणवाद्यांना विश्वास नाही. फटाके अधिक फुटले नाही तर आवाज वाढला कसा, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
समन्वयाचा अभाव
दाेन्ही सरकारी एजन्सी आहेत आणि दाेघांचीही स्वत:ची ओळख आहे. असे असूनही दाेन संस्थामध्ये समन्वय नसणे दुर्भाग्यपूर्ण आहे. प्रदूषणाच्या बाबतीत दाेन्ही संस्थांचे आपसातील समन्वय फायदेशीर ठरेल.
-कौस्तुभ चटर्जी, ग्रीन विजिल
--------
आवाजाचा स्तर अधिक हाेता
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नागपूर शहरात दिवाळीच्या काळात आवाजाचा स्तर अधिक हाेता. काेराेनामुळे लागू केलेल्या दिशानिर्देशामुळे फटाके कमी फाेडण्यात आले असले तरी आवाजाचा स्तर निश्चितच अधिक हाेता.
- ए. एम. काळे, क्षेत्रीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ