शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

बजाज यांना दिलेले आश्वासन पाळणार कसे?

By admin | Updated: November 16, 2015 02:42 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन झाले आणि कामासाठी अतिरिक्त पाच कोटींचा निधीदेखील मिळाला.

नागपूर विद्यापीठ : ‘ग्रीन’ इमारतीच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवातच नाहीयोगेश पांडे नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन झाले आणि कामासाठी अतिरिक्त पाच कोटींचा निधीदेखील मिळाला. दानदाते राहुल बजाज यांना दोन वर्षांनी नव्या इमारतीतून विद्यापीठाचा कारभार सुरू होईल असे आश्वासनदेखील देण्यात आले. परंतु भूमिपूजन होऊन दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला असून प्रशासकीय अडचणीमुळे प्रत्यक्षात बांधकामाच्या ठिकाणी एक वीटदेखील रचण्यात आलेली नाही. कोट्यवधी रुपये दाननिधी दिलेल्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी विद्यापीठ प्रशासनाला प्रचंड धावपळ करावी लागणार आहे.‘कॅम्पस’जवळील ४४ एकर मोकळ््या जागेवर नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी बजाज समूहातर्फे ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) अंतर्गत १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २६ सप्टेंंबर रोजी याचे भूमिपूजन पार पडले. यावेळी राहुल बजाज यांनी हे काम दोन वर्षांत पूर्ण व्हायला हवे व १ आॅक्टोबरपासून याचे ‘काऊंटडाऊन’ सुरू होईल असे प्रतिपादन केले होते. तर ही ‘स्मार्ट’ व ‘ग्रीन’ इमारत पेपरलेस असेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती. कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनीदेखील यासंदर्भात आश्वासन दिले होते. परंतु हा समारंभ होऊन दीड महिना झाला असून प्रत्यक्षात येथे कुठल्याही कामाची सुरुवात झालेली नाही. या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या आराखड्याला मनपाची पूर्ण मंजुरी अद्याप मिळालेली नाही. सध्या विद्यापीठाला तात्पुरती मंजुरीच मिळालेली असून पूर्ण मंजुरीसाठी अद्यापही प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यानंतर इमारतीच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेलादेखील वेळ लागण्याची शक्यता आहे. ही इमारत ‘ग्रीन’ व ‘पेपरलेस’ राहणार असून बांधकामाचे क्षेत्र पाहता जर दर्जेदार बांधकामासाठी नामांकित व अनुभवी कंत्राटदराला काम मिळेल तरच वेळेत काम होणे शक्य आहे. अन्यथा उरलेल्या २२ महिन्यांत पूर्ण प्रक्रिया होऊन इमारतीत प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागेल अशी माहिती सूत्रांनी दिली.जागेच्या नकाशात नदी-नालासंबंधित जागा ही प्रशासनाच्या नोंदींमध्ये ‘हेरिटेज’ जागा आहे. मनपा प्रशासनाकडे असलेल्या नकाशात या ठिकाणी नदी-नाला दाखविण्यात आला होता. त्यामुळे या इमारतीच्या नकाशाला मंजुरी मिळण्यास तांत्रिक अडचण आली. संबंधित अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली व तेथे कुठलीही नदी किंवा नाला नसल्याची खात्री करून घेतली. या तांत्रिक समस्येमुळे प्रशासकीय कामाला उशीर झाला आहे. परंतु या इमारतीच्या कामावर देखरेख करण्यासाठी विशेष पाहणी समिती स्थापन करण्यात आली आहे व मंजुरी मिळाली की पुढील कामाला सुरुवात होईल अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.