शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीनांना वेगवान वाहने चालविण्यापासून कसे थांबवाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 19:06 IST

अल्पवयीन मुलामुलींना वेगवान वाहने चालविण्यापासून कसे थांबवाल? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला विचारला व विशेष उप-समितीच्या बैठकीत यावर विचारमंथन करून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देहायकोर्टाचा सवाल : उपाययोजना करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अल्पवयीन मुलामुलींना वेगवान वाहने चालविण्यापासून कसे थांबवाल? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला विचारला व विशेष उप-समितीच्या बैठकीत यावर विचारमंथन करून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.वाहतुकीसंदर्भातील प्रश्नांबाबत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची ३ फेब्रुवारी रोजी बैठक आहे. गेल्या १९ जानेवारी रोजी हिस्लॉप महाविद्यालयापुढे अपघात होऊन चिन्मय भास्करे (१६) या अल्पवयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तो १२५ सीसीची स्कू टर चालवीत होता. तो सिव्हिल लाईन्स येथील भवन्स शाळेचा विद्यार्थी होता. न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी या घटनेचे उदाहरण देऊन, न्यायालयात विविध सूचनांचा अर्ज दाखल केला. या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्ग संचालकांनी वेगवान वाहने घेऊन येणाऱ्या  विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात प्रवेश देऊ नये, अशी एक सूचना त्यांनी अर्जात केली आहे. न्यायालयाने ही सूचना लक्षात घेता भवन्स शाळेला नोटीस बजावून यावर १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे.त्या अहवालाची दखलशहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनी अहवाल तयार केला आहे. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर, न्यायालयाने या अहवालाचाही अभ्यास करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश विशेष उप-समितीला दिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर