शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कसे येणार प्रदूषण नियंत्रणात? आरटीओतील पीयूसी यंत्र डब्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 10:39 IST

डिझेल व पेट्रोल वाहनांसाठी गेल्या १८ वर्षात टप्प्याटप्प्याने १२० पीयूसी यंत्र वितरित केले. परंतु एवढी वर्षे होऊनही या यंत्राचे ‘कॅलिब्रेशन’च (मापांकन) झाले नाही. परिणामी, कसे येणार प्रदूषण नियंत्रणात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्दे१८ वर्षांपासून १२० यंत्रांचे कॅलिब्रेशन नाही

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहनांमधून उत्सर्जित होणारे घातक घटक वातावरणात मिसळून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन विभागाने सर्व आरटीओ कार्यालयांना वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र देताना ‘पीयूसी’ तपासणी करण्याचे निर्देश दिले. यासाठी डिझेल व पेट्रोल वाहनांसाठी गेल्या १८ वर्षात टप्प्याटप्प्याने १२० पीयूसी यंत्र वितरित केले. परंतु एवढी वर्षे होऊनही या यंत्राचे ‘कॅलिब्रेशन’च (मापांकन) झाले नाही. परिणामी, हे यंत्र आजही डब्यातच पडून असून, कसे येणार प्रदूषण नियंत्रणात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.वाहनांमध्ये जाळल्या जाणाऱ्या इंधनांमुळे वातावरणात सतत वायू उत्सर्जित होतो. या वायूमध्ये कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन, नायट्रोजन आॅक्साईड, पार्टोक्युटेल मॅटर या घातक घटकांचा समावेश असतो. हे घटक मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करतात. ही तपासणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी आरटीओ कार्यालयातून फिटनेस प्रमाणपत्र देताना वाहनाची प्रदूषणाची पातळी ओळखण्यासाठी ‘पोल्युशन अंडर कंट्रोल सटिर्फिकेट’ (पीयूसी) देणारे यंत्र दिले. राज्यातील सुमारे ३५ आरटीओ कार्यालयांना वर्ष २०००मध्ये डिझेल व पेट्रोलवरील वाहनांसाठी प्रत्येकी एक-एक असे ७० पीयूसी यंत्र दिले. त्यानंतर आॅक्टोबर २०१५ मध्ये ५० आरटीओ कार्यालयांना पुन्हा डिझेल वाहनांच्या तपासणीसाठी प्रत्येकी एक यंत्र दिले. या यंत्रामुळे राज्यातील काही आरटीओ कार्यालयात ‘पीयूसी’ यंत्राची संख्या तीनवर गेली. यावर शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र जेव्हापासून हे यंत्र आरटीओ कार्यालयात उपलब्ध झाले तेव्हापासून या यंत्राचा वापरच नाही. संबंधित कंपनीकडून यंत्रात वाहनानुसार ‘कॅलिब्रेशन’च करण्यात आले नसल्याने यंत्र सुरूच नाही. वाहन तपासणीच्यावेळी मोटार वाहन निरीक्षक चौकाचौकातील पीयूसी केंद्रावरून काढलेल्या प्रमाणपत्रालाच ग्राह्य मानून योग्यता प्रमाणपत्र देत आहे. विशेष म्हणजे, यातील काही केंद्रातून मिळणारे प्रमाणपत्र वाहने न तपासताच मिळत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.प्राप्त माहितीनुसार, परिवहन विभागाचे आयुक्त शेखर चन्ने यांनी राज्यभरातील आरटीओ कार्यालयांना त्यांच्याकडे असलेले ‘पीयूसी’ यंत्र वापरात आहे किंवा नाही तसेच त्याचे ‘कॅलिब्रेशन’ झाले किंवा नाही, असे विचारले आहे. अनेक कार्यालयाने ‘कॅलिब्रेशन’ झाले नसल्याचे कळविले असल्याची माहिती आहे.

निरीक्षकाकडून पीयूसी चाचणी करणे अशक्यचराज्यात खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा मोठा भार आरटीओ कार्यालयांवर पडत आहे. त्या तुलनेत कार्यालयात मनुष्यबळाची संख्या अल्प आहे. यातच योग्यता प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या वाहनांची तपासणी ‘इन कॅमेरा’ होते. प्रत्येक वाहनाच्या तपासणीचा वेळ ठरवून दिला आहे. या वेळात मोटार वाहन निरीक्षकाने स्वत: पीयूसी चाचणी करणे शक्य नाही. काही कार्यालयांनी त्या स्थितीतही हे यंत्र चालविण्याचा प्रयत्न केला तर काहीमध्ये बॅटरी नसल्याचे आढळून आले.

टॅग्स :pollutionप्रदूषण