शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

सायलेन्सर, कर्णकर्कश हॉर्नचे यांना काहीच कसे वाटत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:14 IST

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - तुम्ही रस्त्याने जात असताना अचानक वेगाशी स्पर्धा करीत वाहनचालक तुमच्या बाजूने सर्रकन ...

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - तुम्ही रस्त्याने जात असताना अचानक वेगाशी स्पर्धा करीत वाहनचालक तुमच्या बाजूने सर्रकन निघून जाईल. त्यांचा तो बेदरकारपणा तुमच्या अंगावर सरसरून काटा उभा केल्याशिवाय राहणार नाही.

धकाधकीच्या जीवनात तुम्ही आपले शांतपणे रस्त्याने जात असाल अन् अचानक तुमच्या मागून (किंवा समोरून) आलेला वाहनचालक कर्णकर्कश आवाज काढत भरधाव वेगात निघून जाईल. तुमच्या काळजाचा ठोका चुकला नाही तरच नवल. तुमच्या मुखात त्याच्या नावाने शिमगा करणारी प्रतिक्रिया उमटेल. अशा या विकृत वाहनचालकांवर का कठोर कारवाई होत नसेल, असाही प्रश्न त्यावेळी आपसूकच तुम्हाला पडलेला असेल.

जवळपास प्रत्येकच मोठ्या शहरात गेल्या काही वर्षांत ही विकृती वाढीस लागली आहे. धावत्या वाहनावरून ती अधूनमधून नजरेस पडते.

रेसिंग व्हेईकल्सची क्रेझ बिघडलेल्या रईसजाद्यांमध्ये बघायला मिळते. महागड्या आलिशान कार विकत घेऊन, त्या मॉडिफाईड करून अनेक रईसजादे रेसिंगचा शाैक पूर्ण करतात. ते करताना स्वत:सोबत ते दुसऱ्याच्या जीवालाही धोका निर्माण करतात. मात्र, बेदरकार वृत्तीच्या या बिगडेल रईसजाद्यांना त्याची पर्वा नसते. गणराज्य दिनाच्या दिवशी त्यांनी वंजारीनगर उड्डाणपुलावर असाच स्टंटबाजीच्या नावाखाली असाच धिंगाणा घातला होता.

---

बाईकर्सची धूम

बाईकर्सची धूमही अनेकदा काळजाची धडधड वाढविणारी ठरते. रेसिंग बाईकचे मॉडिफिकेशन करून, कर्कश आवाजाचे हॉर्न आणि फटाके फोडणारे सायलेन्सर लावून ही मंडळी वेगाशी स्पर्धा करण्याचा धोका पत्करतात. हे करताना रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या निष्पाप मंडळीच्या जीवाला ते धोका निर्माण करतात. अनेकांचे बळी घेतात अन् सुसाट वेगाने पळूनही जातात.

---

कारवाईचे स्वरूप

दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यावर कायद्यात कडक कारवाईची तरतूद आहे. मात्र, दुसऱ्याच्या जीवाला भररस्त्यावर धोका निर्माण करणाऱ्या विकृत वाहनचालकांवर कडक कारवाई होत नाही. कारण मोटार वाहन कायद्यात तशी तरतूदच नाही. फार फार तर त्यांना वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपात दंडात्मक (तडजोड शुल्क) कारवाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे एखाददुसऱ्या वेळी पकडले गेले तरी बेदरकार वाहनचालक दंडाची जुजबी रक्कम भरून पुन्हा दुसऱ्यांना मानसिक त्रास देण्यासाठी, त्यांच्या जीवाशी खेळण्यासाठी मोकळे होतात.

---

कसा बसणार आळा

वेगात वाहन चालविणे, फटाके फोडणे, कर्कश आवाजाचे हॉर्न लावणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे अशा एकूण १०,८६४ वाहनचालकांवर २०२० मध्ये पोलिसांनी कारवाई केली. गेल्या दोन महिन्यात कारवाईचा हा आकडा १३३७ आहे. मात्र, ही कारवाई केवळ तडजोडच ठरली आहे.

धावत्या वाहनावरच्या विकृतीची नांगी ठेचायची असेल तर त्यांना सरळ कोठडीतच डांबण्याची कायद्यात तरतूद करायला हवी. वाहन चालविणारे आणि त्यांच्या पालकांनाही किमान २४ तास पोलिसांच्या कोठडीची हवा दिली पाहिजे तरच अपघाताचे प्रमाण कमी होईल. दुसऱ्याच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्यांना मनात धाक निर्माण होईल. अन्यथा ही विकृती अशीच वाढत राहील.

----

((कोट))

अशा प्रकारे किंवा वाहतूक नियमांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रसंगी त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याबाबतही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सांगितले जाणार आहे.

सारंग आवाड

पोलीस उपायुक्त, वाहतक शाखा, नागपूर.

---