शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

संगमावरचा शंभू महादेव हे हलाहल कसे पचवत असेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

गणेश हूड/ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रघुजी भोसल्यांच्या सुनेने, म्हणजे मुधोजी यांची पत्नी व दुसरे रघुजींची आई चिमाबाई ...

गणेश हूड/ लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रघुजी भोसल्यांच्या सुनेने, म्हणजे मुधोजी यांची पत्नी व दुसरे रघुजींची आई चिमाबाई यांनी सीताबर्डीजवळ नागनदी व ओढ्याच्या संगमावर महादेवाचे मंदिर बांधले. भक्तिभावाने स्नान, धार्मिक कार्ये त्या पवित्र संगमावर चालायची. हत्ती डुबतील इतके पाणी असायचे. आता मात्र नागनदी नावाच्या गटारगंगेतील हलाहल तो शंभू महादेव रोज कसे पचवत असेल, हा प्रश्नच अस्वस्थ करून जातो.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात, रघुजी भोसले यांचे दोन पुत्र जानोजी व मुधोजी यांच्यात गादीवरून संघर्ष झाला. पाचगावच्या लढाईत जानोजींच्या मृत्यूनंतर मुधोजींचे पुत्र दुसरे रघुजी सत्तेवर आले. सीताबर्डी येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या मागे नागनदी व ओढ्याच्या संगमावर राजमाता चिमाबाईंनी इ.स. १७७९ मध्ये महादेवाचे देऊळ बांधले. त्याआधी व नंतरही संगमावर स्नानासाठी नगरवासी यायचे. भोसले राजघराण्याचे धार्मिक विधी व्हायचे. विजयादशमीला सजवलेले हत्ती, अश्वदळाची मिरवणूक, शस्त्रपूजा, सीमोल्लंघन व्हायचे. राजघराणे तिथूनच नदी ओलांडून राजाबक्षाच्या मारुतीला जायचे.

नागनदीच्या पुनरुज्जीवनानंतर ते जुने वैभव भलेही परत येणार नाही. तथापि, पुन्हा एकदा हलाहल प्राशन करण्याची शंभू महादेवावर आलेली वेळ तरी दूर व्हावी, इतकी अपेक्षा नागपूरकरांची आहे. कारण हा संगम व मंदिर परिसर, नदीपात्र अतिक्रमणांनी पूर्ण वेढले गेले आहे. नदीच्या पाण्यात पाय टाकू शकत नाही, इतके ते विषारी आहे.

....

चौकट...

नदीकाठच्या इमारती, संस्थांचे पुनर्वसन कसे करणार?

महादेव मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य व प्रदूषणाचा विळखा आहेच. त्याशिवाय, नदी-नाल्याच्या संरक्षण भिंतीवरही बांधकामे झाली आहेत. यशवंत स्टेडियमच्या बाजूने नदी पूर्ण गिळंकृत झाली आहे. बाजूलाच नदीकाठावर झोपडपट्टी आहे. पुढे पटवर्धन ग्राऊंडच्या जागेत नदीला खेटून मेट्रोने बांधकाम, मोक्षधामजवळ कॉटन मार्केटकडून येणारा नाला जिथे नदीला मिळतो तिथे नदीपात्रात खांब टाकून स्लॅब यामुळे नदी प्रवाह अडला आहे. जवळच नदीवर कमी उंचीचा पूल आहे. थोडे पुढे डालडा फॅक्टरीकडे जाणाऱ्या मार्गावरील पूलही असाच कमी उंचीचा आहे. ग्रेट कॅनाल रोडने पुढे गेल्यानंतर मातंग वसाहतीमधील घरे नदीकाठावर खेटून आहेत. तिथेही पुलाच्या खांबांनी प्रवाहाला बाधा निर्माण झाली आहे. केळीबागकडे जाणाऱ्या मार्गावरचाही पूल पुरेसा उंच नाही. बाजूलाच नदीकाठावर मूकबधिर विद्यालय व लोकांची शाळा, बैद्यनाथ चौकातील बहुमजली इमारत, डीएड कॉलेज, होमिओपॅथी कॉलेज व बाजूलाच गायत्री मंदिर या सगळ्या संस्थांचे पुनर्वसन, पर्यायी जागा कशी दिली जाईल, ही समस्या दिसते तितकी छोटी नाही.

.............................................