शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आयकर भरूनही नोटीस कशी?; पंचायत समितीचा घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:04 IST

Nagpur : भरलेले ५६ हजार कुठे गेले?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंचायत समिती नागपूर ग्रामीणमध्ये आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कार्यरत असलेल्या समूह साधन केंद्र वाडीचे केंद्रप्रमुख शरद भांडारकर यांनी त्याच्या उत्पन्नावर आकारण्यात आलेला आयकर ५६ हजार ६२ रुपये रोखीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे जमा केले होते. मात्र, त्यानंतरही त्यांना आयकर विभागाकडून नोटीस आल्याने जमा केलेली रक्कम कुठे गेली असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जमा केलेल्या रकमेचा भांडारकर यांनी शोध घेतला असता ही रक्कम त्यांच्या पॅनखात्यावर जमा न करता, पंचायत समितीने ही रक्कम २०१९-२० च्या जुन्या कर आकारणीतील विलंब शुल्क आणि व्याज भरण्यासाठी वापरल्याचे निदर्शनास आले. सेवाकाळात नियमाने कर भरूनही ही नोटीस मिळाल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती भांडारकर यांनी दिली.

घोळ उघड झाला, पण उत्तरदायित्वाचे काय?विषयाची माहिती अधिकारातून विचारणा करूनही कोणताही स्पष्ट खुलासा मिळाला नाही. मात्र, काटोल येथील आयकर सल्लागार प्रवीण भैस्वार यांच्या सहकार्याने हा आर्थिक घोल उघड झाला पंचायत समिती नागपूर ग्रामीण कार्यालयाने भरलेली रक्कम चुकीच्या आर्थिक वर्षात आणि चुकीच्या कारणासाठी वापरली गेल्याने ती भांडारकर यांच्या पॅन खात्यावर जमा झाली नाही. 

न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच !भांडारकर यांनी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती नागपूर यांना ई-मेलद्वारे तक्रार दाखल करून विहित मुदतीत दुरुस्ती करून रक्कम त्यांच्या पॅन खात्यावर जमा करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर ही तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयकर विभागाकडे केली आहे. न्याय न मिळाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरIncome Taxइन्कम टॅक्स