शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

उपराजधानीत लुटारूंचा हैदोस

By admin | Updated: October 28, 2016 02:43 IST

दिवाळीच्या सणाची सर्वत्र धूमधाम सुरू असताना चोर-लुटारूंनी उपराजधानीत अक्षरश: हैदोस घातला.

प्रतापनगरात दारासमोर वृद्धाला लुटले : दागिने आणि रोकड लंपास नागपूर : दिवाळीच्या सणाची सर्वत्र धूमधाम सुरू असताना चोर-लुटारूंनी उपराजधानीत अक्षरश: हैदोस घातला. गुरुवारी दिवसाढवळ्या एका वृद्धाच्या दारासमोरून ९० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून नेली तर, अनेक ठिकाणी लुटालूट, चोरी, घरफोडी करून खळबळ उडवून दिली. पांडे लेआऊटमधील श्रीकृपा अपार्टमेंटमध्ये राहणारे रमेश सीताराम गिराडे (वय ६६) यांनी दिवाळीच्या निमित्ताने लॉकरमध्ये ठेवलेले दागिने काढून घरी आणण्यासाठी बँकेत गेले. सुरेंद्रनगरातील स्टेट बँकेच्या शाखेतून काढलेले ९० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४५ हजारांची रोकड त्यांनी आपल्या जवळच्या बॅगमध्ये ठेवली. त्यानंतर दुपारी १.४५ वाजता ते दुचाकीने घराकडे परत आले. पार्किंगमध्ये दुचाकी ठेवल्यानंतर डिक्कीतून बॅग काढून ते पहिल्या माळ्यावर चढले. तेवढ्यात लाल रंगाची टी-शर्ट घातलेला एक आरोपी मोबाईलवर बोलत वर आला. त्याने आजूबाजूला कुणी नसल्याची खात्री केल्यानंतर गिराडे यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली अन् पळून गेला. आपल्या दारासमोर घडलेल्या या अनपेक्षित घटनेने हादरलेले गिराडे यांनी आरडाओरड केली. मात्र, शेजाऱ्यांना या घटनेची माहिती कळेपर्यंत आरोपी नजरेआड झाला होता. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. गिराडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. लुटारूचा शोध घेतला जात आहे. विद्यानगरातील अंजना आशिष तलवार (वय ५३) या बुधवारी रात्र १०.२० वाजता कोराडी - सावनेर मार्गाने पतीच्या दुचाकीवर बसून जात होत्या. दुचाकीवर मागून वेगात आलेल्या दोन आरोपींनी तलवार यांची हॅण्डपर्स हिसकावून घेतली. पर्समध्ये रोख ९८०० रुपये तसेच मोबाईल आणि एटीएम कार्डसह २५ हजारांचा मुद्देमाल होता. तलवार दाम्पत्याने दिलेल्या तक्रारीवरून कोराडी ठाण्यातील महिला उपनिरीक्षक दराडे यांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला. या घटनेच्या तीन तासानंतर गणेशपेठच्या डालडा कंपनीसमोर राजू रामलू मंडलवार (वय ३१, रा. इंदिरानगर झोपडपट्टी) याला तीन आरोपींनी लुटले. राजू गुरुवारी पहाटे १.४५ वाजता काम आटोपून सायकलने घरी जात असताना त्याला तीन लुटारूंनी थांबविले. मारहाण करून त्याच्या खिशातील सहा हजार हिसकावून घेतले. या लुटमारीसोबतच गरीब राजू मंडलवारच्या घरातील दिवाळीचा आनंद लुटारूंनी हिरावून नेला आहे. गणेशपेठचे उपनिरीक्षक नन्नावरे यांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे. अशीच घटना आज पहाटे ३ वाजता गणेशपेठेतच राममंदिराच्या बाजूला संत्रा मार्केट परिसरात घडली. भंडारा जिल्ह्यातील जुन्नड (ता. तुमसर) येथील राहुल दसाराम राणे (वय ३४) गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास बसस्थानकाकडे जात होते. आरोपी जुनेद आणि त्याच्या एका साथीदाराने राणे यांना रोखले आणि मारहाण करून त्यांच्याजवळचे ३ हजार ९०० रुपये लुटले. राणे यांनी तक्रार देताच पोलीस उपनिरीक्षक नन्नावरे आणि सहकाऱ्यांनी धावपळ करून आरोपी जुनेद तसेच हैदरला ताब्यात घेतले. या दोघांनी गुन्हा कबूल केला. त्यानंतर यापूर्वी डालडा कंपनीजवळ घडलेल्या घटनेतील फिर्यादी राजू मंडलवार यालाही आरोपींना दाखवण्यात आले. मात्र, आरोपी काळे हेल्मेट घालून अंधारात असल्यामुळे त्याने या आरोपींबाबत स्पष्ट ओळख पटविण्यास असमर्थता दर्शवली.(प्रतिनिधी)