नागपूर : कळमना येथे एका परिचारिकेला तलवारीने हल्ला करून जखमी केले. विजयनगर येथील ४० वर्षीय किरण मनोज साहू हॉस्पिटलमध्ये परिचारिका आहे. त्या मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता नाईट ड्युटीपर जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. भरतनगरमध्ये आॅटोची वाट पाहत उभ्या होत्या. त्याचवेळी २५ वर्षीय युवक त्यांच्याजवळ आला. त्याने किरणचे तोंड दाबले. डोक्यावर तलवारीने वार करून फरार झाला. किरणला जखमी अवस्थेत रुग्णालयात पोहोचवण्यात आले. या घटनेत ओळखीच्या व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)
परिचारिकेवर तलवारीने हल्ला
By admin | Updated: November 3, 2016 03:39 IST