शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

हॉरिबल! धडकेत जखमी झालेल्याला कारमध्ये बसविले, पुढे पुलाखाली फेकले, उपचाराअभावी कामगाराचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: April 1, 2025 22:37 IST

Nagpur Crime News: नागपुरात कारचालकाकडून असंवेनशीलतेचा कळस : उपचाराच्या बहाण्याने कारमध्ये बसविले

- योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकीवरील कामगाराला धडक देऊन जखमी केल्यानंतर एका कारचालकाने असंवेदनशीलतेचा कळसच गाठला. जखमीला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने कारमध्ये टाकले व काही अंतरावर पुलाखाली फेकून दिले. वेळेवर उपचार न मिळाल्याने कामगाराचा मृत्यू झाला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ही घटना घडली.

कृष्णा बुलसे (४५, अयोध्या नगर) असे मृतक कामगाराचे नाव आहे. बांधकाम कामगार असलेले रुपेश वाकळे आणि कृष्णा बुलके हे दोघेही गुमगाव येथे बांधकामाच्या ठिकाणी भेट द्यायला गेले होते. सोमवारी सायंकाळी आठ वाजता ते दुचाकीने परत जात होते. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटजवळ एका पांढऱ्या रंगाच्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात कृष्णा जखमी झाले व त्यांच्या डोक्याला मार बसला होता. तेथे नागरिकांची गर्दी जमल्याने कारचालकाने उपचाराच्या बहाण्याने कृष्णाला कारमध्ये टाकले. मात्र चिंचभुवन पुलाजवळ गेल्यावर त्याने कार खाली घेतली व कृष्णाला कारमधून फेकून दिले. त्यानंतर कारचालक तेथून फरार झाला.

दरम्यान रुपेशने पोलिसांना फोनवर झालेल्या अपघाताची माहिती दिली होती. पोलिसांनी शोधाशोध केली असता जखमी कृष्णा मेयो, मेडिकल, एम्स किंवा इतर कुठल्याही रुग्णालयात दाखल नसल्याची बाब समोर आली. पोलीस त्याचा शोध घेत असताना पहाटे चार वाजताच्या सुमारास चिंचभुवन पुलाखाली ते निपचित पडलेला आढळला. पोलिसांनी त्यांना इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी कारचालकाचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पडताळले जात आहे.

वेळेवर उपचार मिळाले असते तर वाचला असता जीवकृष्णा यांच्या डोक्याला मोठी जखम झाली होती व ते वेदनांनी विव्हळत होते. त्यांना उपचार मिळणे गरजेचे असल्याने कारचालकावर विश्वास टाकत रुपेशने त्याला जाऊ दिले. मात्र कारचालकाने विश्वासघात केला. वेळेवर उपचार मिळाले असते तर कृष्णा यांचा जीव वाचला असता.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी