शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आक्रोशात अंत्यदर्शनाची आस; जिवंत स्फोटके मलब्याखाली दबल्याने मृतदेह काढण्यात अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 06:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सोलर इंडस्ट्रीजमधील दुर्घटनेनंतर आपल्या जिवलगाला अखेरचे पाहण्यासाठी नातेवाइकांचे डोळे दिवसभर आसुसलेले होते, तर कालपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोलर इंडस्ट्रीजमधील दुर्घटनेनंतर आपल्या जिवलगाला अखेरचे पाहण्यासाठी नातेवाइकांचे डोळे दिवसभर आसुसलेले होते, तर कालपर्यंत ज्यांच्यासोबत काम करत होतो ते आपल्यात नसल्याचे कळताच कामगारांमध्ये आक्रोश होता. रविवारी दिवसभर कंपनीसमोर वेदना, आक्रोशाचे वातावरण हाेते. 

दरम्यान, संतप्त कामगार कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर एकत्रित आले होते. काही तरुणांनी अमरावती महामार्ग जाम करण्याचा दोन ते तीनवेळा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी धाव घेत त्यांना पिटाळून लावले. दुर्घटनेनंतर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी नागपूर ग्रामीण व वर्धा जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त बोलविण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

आईच्या संघर्षाला फळ येत होतं अन् मोसम गेलावरठी (जि. भंडारा) : स्फोटातील मृतांमध्ये मोसम राजकुमार पटले (वय २४) याचा समावेश असल्याची माहिती मिळताच त्याच्या आईने हंबरडा फोडला अन् काही वेळातच ती निपचित पडली. पाचगाव येथील घर व गाव शोकात बुडालं. मोसमच्या वडिलांचे २०११ मध्ये निधन झाले. त्याच्या आईने मोलमजुरी करून कुटुंब सांभाळले, मोसम व लहान भाऊ सावन यांचे शिक्षण पूर्ण केले. आता आयुष्यात सुख येणार होते. तोच या मोसमच्या जाण्यानं हादरा बसला. 

मोसमने काम करत करत अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. प्रशासकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी नागपूर गाठले आणि याच वर्षी सोलर इंडस्ट्रीजमध्ये तो ऑगस्ट २०२३ ला रुजू झाला. त्याचा लहान भाऊ कोल्हापुरात सैन्य भरतीची तयारी करीत आहे.

दुर्घटनेतील मृतांची नावे युवराज किसनाजी चारोडे (बाजारगाव, ता. जि.नागपूर), ओमेश्वर किसनलाल मछिर्के (चाकडोह, ता. जि. नागपूर), मिता प्रमोद उईके (रा. अंबाडा सोनक, ता. काटोल, जि. नागपूर), आरती नीळकंठ सहारे (कामठी मासोद, ता. काटोल, जि. नागपूर), श्वेताली दामोदर मारबते (कन्नमवारग्राम, ता. कारंजा, जि. वर्धा), पुष्पा श्रीराम मानापुरे (रा. तेलीपुरा, शिराला, जि. अमरावती), भाग्यश्री सुधाकर लोणारे (रा. भुजतुकूम, ता. ब्रह्मपुरी, जि.चंद्रपूर), रुमिता विलास उईके (ढगा, ता. कारंजा, जि. वर्धा) व मोसम राजकुमार पटले (रा.नेहरू वॉर्ड,पाचगाव, ता. मोहाडी, जि.भंडारा) 

लेकीचा चेहरा पाहू द्या हो... दिव्यांग माय-बाप हळहळलेनागपूर : स्फोटात मृत्यू झालेली आरती निळकंठ सहारे (२२, कामठी मासोद, ता. काटोल) ही तिच्या दिव्यांग आईवडिलांचा आधार होती. त्यांच्यासाठी तिने स्वत:च्या लग्नाकडे दुर्लक्ष केले. लहान बहिणीचे लग्नही लावून दिले. पण हाच आधार गेल्याने आई-वडिलांना हादरा बसला आहे. आरतीच्या आईला बोलता येत नाही. पण तिच्या मनातील आक्रोश अश्रूंवाटे बाहेर येत आहे.

हलाखीच्या परिस्थितीने घेतला भाग्यश्रीचा बळीब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : भूज (ता. ब्रह्मपुरी) येथे सुधाकर लोणारे हे एक मुलगा व एका मुलीसोबत राहतात. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पदवीधर भाग्यश्रीने पुण्यातील कंपनीत पाच वर्षे नोकरी केली. नंतर ती बाजारगावातील कंपनीत कामाला गेली. उद्देश हाच की, कुटुंबाला हातभार लागावा, पण रविवारी कंपनीत स्फोट झाला अन् यात भाग्यश्रीचा बळी गेला. ती दोन वर्षांपासून येथे कामाला होती. 

टॅग्स :Blastस्फोट