शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

नागपुरातील वर्धमान नगरात हुक्का पार्लर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 21:30 IST

Hookah Parlor raid, Nagpur crime news लकडगंज पोलिसांनी वर्धमान नगरातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा घातला. या ठिकाणी पोलिसांनी हुक्का पार्लरच्या व्यवस्थापकासह नऊ जणांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देपोलिसांचा छापा : नऊ आरोपी ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लकडगंज पोलिसांनी वर्धमान नगरातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा घातला. या ठिकाणी पोलिसांनी हुक्का पार्लरच्या व्यवस्थापकासह नऊ जणांना ताब्यात घेतले. वर्धमान नगरातील सागर अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. त्याची माहिती कळताच शुक्रवारी रात्री लकडगंज पोलिसांनी तेथे छापा मारला. यावेळी तेथे काही तरुण धूर उडवताना दिसले. पोलिसांनी हुक्का पार्लरचा व्यवस्थापक राजेशकुमार दुबे तसेच संयम प्रदीप जैन, अक्षद विनोद जैन, हर्ष संदीप जैन, अर्चित राजेंद्र देशमुख, आयुष हरीश मेहता, मोहम्मद सुफियान, जाहिद नसीम अख्तर आणि अर्सलान हारुण अन्सारी यांना ताब्यात घेतले. कोरोना संक्रमणामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशात ही मंडळी एकमेकांना खेटून हुक्क्याचा धूर उडवत बसली होती. पोलिसांनी त्यांना साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई ठाणेदार नरेंद्र हिवरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पीएसआय सुनील राऊत, हवालदार भोजराज बांते आणि शिपाई प्रदीप मंगेश व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.कोणताही परवाना नाहीविशेष म्हणजे, बिनबोभाटपणे चालविल्या जाणाऱ्या या हुक्का पार्लरच्या संचालकाकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. विनापरवाना हे हुक्का पार्लर चालविणारा आणि तेथे येणाऱ्यांना खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या या आस्थापनाचा मालक पांडे नामक व्यक्ती असल्याचे समजते. तो देशपांडे ले-आऊटमध्ये राहतो. पोलिसांचा छापा पडताच तो फरार झाला. लकडगंज पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसraidधाड