शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामा वीरपत्नीचा सन्मान; हर मुश्किल का तेरे पासही हल है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 10:34 IST

‘कदम से कदम आज तू, मिला रही है हर मर्द से, आँख मिलाती है तू, हर दर्द से, तुम्ही से आज तुम्ही से कल है, हर मुश्किल का तेरे पासही हल है’ या कवितेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या अंजली गद्रे यांनी वीरपत्नींचे मनोबल उंचावले.

ठळक मुद्दे अंजली गद्रे यांनी उंचावले मनोबल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कदम से कदम आज तू, मिला रही है हर मर्द से, आँख मिलाती है तू, हर दर्द से, तुम्ही से आज तुम्ही से कल है, हर मुश्किल का तेरे पासही हल है’ या कवितेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या अंजली गद्रे यांनी वीरपत्नींचे मनोबल उंचावले. गद्रे शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाकरिता कार्य करतात.पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातील संजयसिंह दीक्षित राजपूत (मलकापूर) यांच्या पत्नी सुषमा यांचा जागतिक महिला दिवसानिमित्त विदर्भ महिला वकील संघटनेच्यावतीने शुक्रवारी शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी गद्रे यांनी ही कविता सादर केली. संघटनेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड. पल्लवी खरे, अध्यक्षा अ‍ॅड. पद्मा चांदेकर, सचिव रितू कालिया व्यासपीठावर उपस्थित होत्या. याप्रसंगी राजपूत यांची दोन मुले व दोन नातेवाईकांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सभागृहात पार पडला.राजपूत यांनी २० वर्षे देशसेवा केली. त्यांनी आणखी सेवाकाळ वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाला शब्दांत व्यक्त केले जाऊ शकत नाही. शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी सरकारच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तसेच, आपण प्रत्येकाने या कुटुंबांचा मानसिक आधार झालो पाहिजे असे गद्रे यांनी पुढे बोलताना सांगितले.चांदेकर व खरे यांनीदेखील समयोजित विचार व्यक्त केले. याप्रसंगी हायकोर्ट बार असोसिएशन, कामगार न्यायालय वकील संघटना, ग्राहक वकील संघटना, अधिवक्ता परिषद, सहकार न्यायालय वकील संघटना, हायकोर्ट कर्मचारी आदींनीही सुषमा राजपूत यांचा सन्मान केला. जयश्री अलकरी यांनी संचालन केले तर, सुनिता चचोदिया यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सुषमा राजपूत गहिवरल्यासन्मानाला उत्तर देताना सुषमा राजपूत यांना गहिवरून आले. त्यामुळे त्यांना सावरावे लागले. पतीवर फार प्रेम होते. त्यांना आयुष्यभर विसरू शकणार नाही. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्यावर गर्व आहे. त्यांना आणखी देशाची सेवा करायची होती. जीवनात कधीच घाबरायचे नाही असे ते नेहमीच म्हणत होते. त्यांचे हे शब्द जगण्याचे बळ देतात अशा भावना सुषमा राजपूत यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन