शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

वयाच्या ८२ व्या वर्षी ‘डीएसस्सी’चा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 10:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: निवृत्तीनंतर आपले कुटुंबीय व चौकट यापुरतेच अनेकांचे आयुष्य मर्यादित होते. मात्र काही जण आयुष्यात नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याच्या जिद्दीने भारलेले असतात. त्यांच्यातील विद्यार्थी व संशोधक त्यांना स्वस्थ बसू देत नाही व यातूनच ते नवीन इतिहास घडवितात. उपराजधानीतील ८२ वर्षीय डॉ.आनंद भोळे यांनीदेखील अशीच प्रेरणादायी कामगिरी ...

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठात आनंद भोळे यांचे संशोधन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: निवृत्तीनंतर आपले कुटुंबीय व चौकट यापुरतेच अनेकांचे आयुष्य मर्यादित होते. मात्र काही जण आयुष्यात नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याच्या जिद्दीने भारलेले असतात. त्यांच्यातील विद्यार्थी व संशोधक त्यांना स्वस्थ बसू देत नाही व यातूनच ते नवीन इतिहास घडवितात. उपराजधानीतील ८२ वर्षीय डॉ.आनंद भोळे यांनीदेखील अशीच प्रेरणादायी कामगिरी केली आहे. स्थापत्य अभियांत्रिकीतील मौलिक संशोधनासाठी त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून ‘डीएसस्सी’ (डॉक्टर आॅफ सायन्स) या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये ‘डीएसस्सी’ घेणारे डॉ.भोळे हे देशातील पहिलेच प्रोफेसर ठरणार आहेत.Þडॉ.भोळे यांनी आपल्या संशोधनातून ‘इलेक्ट्रीकल’ आणि ‘मेकॅनिकल’ या संकल्पनांचा उपयोग न करता भूजल शुद्ध करण्याचे संशोधन केले व त्यात त्यांना यशदेखील आले. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ‘सिम्पल अ‍ॅन्ड लो कॉस्ट वॉटर ट्रीटमेन्ट टेक्नॉलॉजी फॉर रुरल एरिया’ या विषयावर त्यांनी संशोधन सादर केले. त्यांचे ‘पेटन्ट्स’ व विविध शोधपत्रिका याच्यावर हे संशोधन आधारित होते. नोव्हेंबर महिन्यात विद्यापीठ त्यांना ‘डीएसस्सी’ प्रदान करणार आहे.

२५० तांत्रिक शोधपत्रिका प्रकाशितनागपुरचेच रहिवासी असलेल्या डॉ.आनंद भोळे यांनी जबलपूर विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९५६ साली पर्यावरण विज्ञान या विषयात ‘रुडकी’ येथून ‘एमई’ केले. त्यांनी लंडन विद्यापीठात ‘पीएचडी’ पदवी मिळविली. यासाठी त्यांना ‘युनेस्को’ची ‘फेलोशीप’देखील मिळाली होती. १९६१ मध्ये ‘व्हीआरसीई’मध्ये (आताचे ‘व्हीएनआयटी’) ते प्राध्यापकपदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला संशोधनाला वाहून घेतले व सुमारे २५० तांत्रिक शोधपत्रिका प्रकाशित केल्या. त्यांच्या नावावर १२ पेटंट्सची नोंदणी असून त्यांच्या मार्गदर्शनात २५ विद्यार्थ्यांनी ‘पीएचडी’ पूर्ण केली. विद्यापीठातदेखील अभ्यासमंडळ, ‘आरआरसी’ इत्यादी प्राधिकरणांवर ते कार्यरत होते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखडॉ.आनंद भोळे यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील ओळख आहे. ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’तर्फे ग्रामीण भागातील पाणीपुरवाठ व स्वच्छता या विषयावरील प्रारुप तयार करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र