शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

व्हाईस रेकॉर्डिंगसाठी हनीसिंगचा नकार

By admin | Updated: March 2, 2015 02:33 IST

अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेला पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ यो यो हनीसिंगने रविवारी पाचपावली पोलीस ठाण्यात हजेरी लावली.

नागपूर : अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेला पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ यो यो हनीसिंगने रविवारी पाचपावली पोलीस ठाण्यात हजेरी लावली. पण स्वत:हून व्हाईस रेकॉर्डिंगची परवानगी देण्यास नकार दिला. यामुळे पोलिसांचा हनीसिंगला बोलाविण्याचा मूळ उद्देशच पूर्ण होऊ शकला नाही.व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व अन्य पंजाबी रॅप गायक आदित्य पी.पी. सिंग ऊर्फ बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दोघांनीही सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या आदेशामुळे दोघांनीही पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित राहून बयान नोंदविले होते. यानंतर पोलिसांनी सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून अटकपूर्व जामीन अर्ज खारीज झाल्यास दोघेही चौकशीस सहकार्य करणार नाही, अशी भीती व्यक्त केली. यामुळे १६ जानेवारी रोजी सत्र न्यायालयाने दोघांनाही त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणीच्या तारखेस व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. याविरुद्ध त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल करून पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती. ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने दोघांनीही २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता व तपास अधिकाऱ्याला आवश्यक तेव्हा पाचपावली पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या अटीवर सत्र न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द केला होता. तसेच पोलिसांनी कायद्यानुसार व दोघेही स्वत:हून तयार असतील तेव्हाच व्हाईस रेकॉर्डिंग करावे, असे स्पष्ट केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हनीसिंग निर्धारित तारखेच्या एक दिवस आधीच तपास अधिकाऱ्यांसमक्ष हजर झाला. (प्रतिनिधी)पोलिसांना सहकार्य केल्याचा दावाहनीसिंगने पोलिसांना पूर्ण सहकार्य केले. अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली, असा दावा अ‍ॅड. अतुल पांडे (हनीसिंगचे वकील) यांनी केला. याशिवाय त्यांनी व्हाईस रेकॉर्डिंगसंदर्भातील प्रश्नाचाही खुलासा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांना कुणालाही व्हाईस रेकॉर्डिंग देण्याची बळजबरी करता येत नाही. पोलिसांना हा अधिकार नाही. संबंधित व्यक्ती स्वत:हून तयार असेल तरच व्हाईस रेकॉर्डिंग घेता येते, अशी माहिती अ‍ॅड. पांडे यांनी दिली.बादशाह आज येण्याची शक्यताउच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बादशाहला कोणत्याही परिस्थितीत उद्या, सोमवारी पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे लागणार आहे. अन्यथा त्याला न्यायालय अवमाननेच्या कारवाईस सामोरे जावे लागेल.अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीहनीसिंग व बादशाह यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या, सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. दोघांनाही यापूर्वीच सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, तपासाकरिता आवश्यक तेव्हा पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे, यासह विविध अटी न्यायालयाने ठेवल्या आहेत.उच्च न्यायालयात मांडणार मुद्दा४जब्बल यांनी हनीसिंग व बादशाह यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यासाठी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. रसपालसिंग रेणू हे हनीसिंगच्या व्हाईस रेकॉर्डिंगचा मुद्दा उच्च न्यायालयासमक्ष उपस्थित करणार आहेत. पोलिसांनी हायकोर्टाच्या दणक्यानंतरच दोघांविरुद्ध एफआयआर नोंदविला होता, हे उल्लेखनीय. हनीसिंग व बादशाहच्या अश्लील गाण्यांमुळे युवकांवर वाईट परिणाम होत आहे. समाजात असंस्कृत वातावरण निर्माण होत आहे, असे जब्बल यांचे म्हणणे आहे.