शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

होमिओपॅथीमुळे दुर्धर आजार होतात बरे : होमिओपॅथी तज्ज्ञांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:49 IST

होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वर्तणूक, वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही ‘पॅथी’ आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. हृदयविकार, वंध्यत्व, मानसिक आजार, अस्थमा, त्वचारोग यासारख्या असंख्य रुग्णांना होमिओपॅथीद्वारे बरे करण्यात आले आहे, असा सूर होमिओपॅथी तज्ज्ञांचा होता.

ठळक मुद्दे ‘होमिओ वोयेज-२०१९’ला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वर्तणूक, वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही ‘पॅथी’ आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. हृदयविकार, वंध्यत्व, मानसिक आजार, अस्थमा, त्वचारोग यासारख्या असंख्य रुग्णांना होमिओपॅथीद्वारे बरे करण्यात आले आहे, असा सूर होमिओपॅथी तज्ज्ञांचा होता.ऑरेंज सिटी होमिओपॅथ्स असोसिएशनच्यावतीने आयोजित एक दिवसीय ‘होमिओ वोयेज-२०१९’ परिषदेत होमिओपॅथी तज्ज्ञ एकत्र असताना त्यांनी विविध आजारांवर व त्यांच्यावरील उपचारावर प्रकाश टाकला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश रथकंठीवार, तर अध्यक्षपदी डॉ. मनीष पाटील उपस्थित होते.परिषदेत, मुलांचा बदलता स्वभाव यावर डॉ. स्मिता अडकिने यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांमध्ये वाढत असलेला चिडचिडेपणा, अभ्यासाची कमी झालेली आवड, एकाग्रता यावर होमिओपॅथीमध्ये उपलब्ध उपचारपद्धतीची माहिती दिली. डॉ. कुणाल अंबादे व डॉ. स्वप्निल घायवत यांनी अल्पावधीत विविध आजारांवर होमिओपॅथीच्या यशस्वी उपचाराची काही प्रकरणे सादर केलीत. डॉ. सचिन धमगये व डॉ. सोनल पंचभाई यांनी ‘अ‍ॅडव्हान्स पॅथालॉजिकल’ प्रकरणातही होमिओपॅथीमध्ये यशस्वी उपचार संभव असल्याचे सांगितले.संचालन डॉ. गोपी मर्दिना व डॉ. नागसेन चव्हाण यांनी केले. आभार डॉ. रूपल कारवा यांनी मानले. परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. अनिता मदनकर, डॉ. सुश्रुत सेलोकर, डॉ. रोहित मैत्रीकर, डॉ. कल्याणी दूरदुले, डॉ. प्राची चौकसे, डॉ. शिल्पा, डॉ. कुशल नारनवरे, डॉ. स्वाती शिवहरे, डॉ. प्रतीक्षा अंभारे, डॉ. अक्क्षा साबू, डॉ. शुभांगी राजूरकर, रुचिका मडावी, प्रियंका त्रिवेदी, शिवानी दशोत्तर, धनश्री यांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य