शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

नागपुरातील गुन्हेगारांची घरवापसी ठरली धोकादायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:54 IST

कोरोनामुळे ज्या गुन्ह्यात सात वर्षांपर्यंत शिक्षा झाली किंवा होऊ शकते, अशा गुन्ह्यातील आरोपींना जामिनावर बाहेर सोडण्याचा निर्णय झाला. त्यांनी सामान्य नागरिकच नव्हे तर पोलिसांचीही डोकेदुखी वाढवली आहे.

ठळक मुद्देमोकाट गुंडांकडून शहर वेठीस धरण्याचा प्रयत्न

: ठिकठिकाणी हैदोसनरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या भीतीपोटी कारागृहातून जामिनावर सोडलेल्या गुंडांनी शहर वेठीस धरण्याचा प्रयत्न चालविला आहे. जागोजागी गंभीर गुन्हे करून हे गुंड कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लावत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवीत आहेत. या मोकाट गुंडांनी हत्या, हत्येचा प्रयत्न, हाणामाऱ्या, लुटमार, बलात्कार, जबरी चोºया असे गंभीर गुन्हे करून सर्वसामान्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण केली आहे.गेल्या दोन वर्षात गुन्हेगारांना पद्धतशीर नियंत्रित करून शहरातील क्राईम रेट कमी करण्यात पोलिसांनी यश मिळवले होते. मात्र कोरोनामुळे ज्या गुन्ह्यात सात वर्षांपर्यंत शिक्षा झाली किंवा होऊ शकते, अशा गुन्ह्यातील आरोपींना जामिनावर बाहेर सोडण्याचा निर्णय झाला. त्यामुळे ७२० गुन्हेगारांना कारागृहातून बाहेर सोडण्यात आले. यातील जवळपास ५०० गुन्हेगार नागपुरातील आहेत.मोठमोठे गुन्हे करून त्यांनी शहर वेठीस धरण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरात नागपुरात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, हल्ले, लुटमारीचे आणि हाणामारीचे गुन्हे वाढले आहेत. त्यांनी सामान्य नागरिकच नव्हे तर पोलिसांचीही डोकेदुखी वाढवली आहे.मोकाट सुटलेल्या गुन्हेगारांपैकी एकाने कारागृहातून जामिनावर बाहेर पडल्यानंतर तिसºयाच दिवशी नागपुरातील पोलीस हवालदाराच्या पत्नीला शस्त्राचे घाव घालून ठार मारले.कोरोनाचा लाभ मिळून नुकत्याच बाहेर आलेल्या आणि तब्बल १०५ गुन्ह्यांतील आरोपी असलेल्या एका गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने अंबाझरीत एका तरुणीचा विनयभंग करून तिच्या भावावर प्राणघातक हल्ला केला.गेल्या आठवड्यात यशोधरानगरात ठार मारण्यात आलेला कुख्यात अनू ठाकूर नुकताच कारागृहातून बाहेर आला होता. त्याने तिकडे दहशत पसरवणे सुरू केले होते.हुडकेश्वर परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेले आणि पोलिसांनी घातक शस्त्रांसह पकडलेले १० कुख्यात गुन्हेगार नुकतेच कारागृहातून बाहेर आलेले आहेत.

विशेष मोहीम सुरूकारागृहातून सशर्त जामिनावर गुन्हेगार बाहेर आले आहेत. बाहेर येताच त्यांनी गुन्हेगारी वर्तन सुरू करून शर्तींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे अशा गुंडांना हुडकण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यांना लवकरच कारागृहात डांबले जाणार असल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी