शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत २७ एप्रिल रोजी एकाच मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 10:56 IST

तीन महिन्यांत शाह यांचा हा दुसरा नागपूर दौरा ठरणार आहे

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे २७ एप्रिल रोजी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेदेखील उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. जामठा येथे एका संस्थेच्या कार्यक्रमात शाह उपस्थित राहतील.

तीन महिन्यांत शाह यांचा हा दुसरा नागपूर दौरा ठरणार आहे. फेब्रुवारी महिन्यात अमित शाह हे नागपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’च्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे दीक्षाभूमी व रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरालादेखील भेट दिली होती. २७ एप्रिल रोजी शाह येणार असते तरी यावेळी भाजपकडून शक्तिप्रदर्शन टाळण्यात येणार आहे. संबंधित कार्यक्रम एका संस्थेचा असून उन्हाची संभाव्य तीव्रता लक्षात घेता गर्दी टाळण्यावर भाजपचा भर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, शाह नागपूर दौऱ्यावर येणार असल्याच्या वृत्ताला भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी दुजोरा दिला आहे. भाजपकडून नेमके काय नियोजन राहणार यावर वरिष्ठांच्या सूचनेवरून पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणAmit Shahअमित शाहMohan Bhagwatमोहन भागवत