शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्था असेल तर होम आयसोलेशनचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 23:50 IST

लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जर घरात व्यवस्था असेल तर होम आयसोलेशन हा पर्याय आहे. अशा रुग्णांनी शासन आणि मनपाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करावे. डॉक्टरांशी समन्वय ठेवावा, असे आवाहन आय.एम.ए.चे माजी अध्यक्ष डॉ. आनंद काटे यांनी केले.

लोकमन न्यूज नेटवर्कनागपूर : लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जर घरात व्यवस्था असेल तर होम आयसोलेशन हा पर्याय आहे. अशा रुग्णांनी शासन आणि मनपाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करावे. डॉक्टरांशी समन्वय ठेवावा, असे आवाहन आय.एम.ए.चे माजी अध्यक्ष डॉ. आनंद काटे यांनी केले.मनपा आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी ‘कोविड संवाद’ या शीर्षकांतर्गत ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद उपक्रमाला बुधवारी सुरुवात झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. आनंद काटे आणि डॉ. अर्चना कोठारी उपस्थित होत्या. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी प्रारंभी कोविड संवाद मागील संकल्पना विषद केली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांना उपचाराबाबत माहिती देणे गरजेचे आहे. लक्षणे नसलेले रुग्ण अधिक आहे, जे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांना यादरम्यान काय करायचे, याबाबत मार्गदर्शन व त्यांच्या मनातील शंका, प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कोठारी यांनी होम आयसोलेशनमधील रुग्णांना नेहमीच पडत असलेले प्रश्न विचारले. या प्रश्नांना काटे यांनी समर्पक उत्तरे दिलीत. घरात जर स्वतंत्र खोली, बाथरूम, शौचालय स्वतंत्र असेल अशा व्यक्तींनीच होम आयसोलेशनचा पर्याय निवडावा, आयसोलेशन दरम्यान शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे, नियमित मास्क घालावा, कुटुंबातील लोकांना दूर ठेवावे, डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचे न चुकता सेवन करावे, अशी उपयुक्त माहिती दिली.आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड कराआरोग्य सेतू अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ठेवावा. आयसोलेशनदरम्यान त्रास जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ताप आणि आॅक्सिजन लेव्हल सातत्याने तपासावी, असा सल्लाही त्यांनी दिला.नियम पाळा, काळजी घ्या!अनेकांनी फेसबुकवर विचारलेल्या प्रश्नांनाही काटे आणि कोठारी यांनी उत्तरे देत रुग्णांचे समाधान केले. नियम पाळा, काळजी घ्या, प्रत्येकाला कोरोना आहे, या भावनेतून सामाजिक अंतर पाळा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आज गुरुवारी दुपारी २ वाजेपासून कोविड संवाद कार्यक्रमामध्ये डॉ. रवींद्र सरनाईक आणि डॉ. अर्चना कोठारी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर