शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

वीज चोरी करणाऱ्यांना गृह विभागाचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 20:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी गृह विभागने राज्यात १३२ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे. या संदभार्तील एक परिपत्रक गृह विभागाने २८ फेब्रुवारी रोजी जारी केले आहे. या १३२ पोलीस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंजाईजी वितरण किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी ...

ठळक मुद्दे राज्यात १३२ पोलिस ठाण्यात होणार गुन्हे दाखल : विदर्भातील ३३ ठाण्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी गृह विभागने राज्यात १३२ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे. या संदभार्तील एक परिपत्रक गृह विभागाने २८ फेब्रुवारी रोजी जारी केले आहे. या १३२ पोलीस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंजाईजी वितरण किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी चोरी संदर्भात घडलेल्या गुन्ह्यांशी संबंधीत प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल.साधारणत: प्रत्येक जिल्हयात तीन ते चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करता येतील. मोठया शहरांमध्ये ५ पोलीस ठाण्यांना वीज चोरी बाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूवीर्चे महावितरणचे ६ पोलीस ठाणे बंद करण्यात आले. वीज चोरीच्या माध्यमातून सुमारे १० टक्के वितरण हानी होत आहे. राज्यात अहमदनगर जिल्हयात ४ पोलीस ठाणे, औरंगाबाद जिल्हयात ५, बीड जिल्हयात ४, ठाणे जिल्हयात १०, धुळे जिल्ह्यात ३, हिंगोलीत ३, नांदेड जिल्हयात ४ पोलीस ठाणे नाशिक जिल्हयात ५, जालन्यात ३, परभणी जिल्हयात ३, उस्मानाबाद 3, लातूर 3, नागपूर शहर व ग्रामीण मिळून ७, पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करता येणार आहे.पुणे शहर व ग्रामीण मिळून ७ पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीची तक्रार दाखल करता येईल. सोलापूर जिल्हयात ७, अकोला ७, अमरावती ७, भंडारा २, बुलढाणा २, चंद्रपूर ३, गडचिरोली २, गोंदिया जिल्ह्यात ३, जळगाव जिल्ह्यात ४, कोल्हापूर जिल्हयात ४, नंदूरबार ४, पालघर ६, रायगड ४, रत्नागिरी २, सांगली ३, सातारा ३, सिंधुदुर्ग २, वर्धा २, वाशिम ३,यवतमाळ ४, मुंबई शहर व उपनगरात ७ पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येतील.७ हजार २७४ कोटींची थकबाकी वीज बिल न भरल्यामुळे राज्यातील निवासी २६ लाख ९० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे, तर २ लाख ३५ हजार कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. या निवासी ग्राहकांकडे दंड व्याजाची रक्कम म्हणून २३५१ कोटी तर कृषी ग्राहकांकडे ८८६ कोटी वीज बिलची थकबाकी आहे. वीज बिल न भरणाऱ्या निवासी, कृषी व अन्य ग्राहकांकडे दंड व्याज धरून ७ हजार २७४ कोटींची वीज बिलची थकबाकी आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPoliceपोलिस