शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

नागपूर शहरात दारूची ‘होम डिलिव्हरी’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 00:24 IST

शहरात दारूची होम डिलिव्हरी सुरू झाली. आज पहिल्या दिवशी ऑनलाईन दारू मिळवणारे शहरातील मद्यपी मोजकेच ठरले. बहुतांश ठिकाणी केवळ ऑनलाईन ऑर्डर देण्यात आल्या असून प्रत्यक्ष डिलिव्हरीला उद्या शनिवारपासून सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्देधरमपेठमध्ये उघडलेले दारू दुकान पोलिसांनी केले बंददुकानदारांनी पेंडॉल टाकून मोबाईल क्रमांकांचे लावले बॅनर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात दारूची होम डिलिव्हरी सुरू झाली. आज पहिल्या दिवशी ऑनलाईन दारू मिळवणारे शहरातील मद्यपी मोजकेच ठरले. बहुतांश ठिकाणी केवळ ऑनलाईन ऑर्डर देण्यात आल्या असून प्रत्यक्ष डिलिव्हरीला उद्या शनिवारपासून सुरुवात होणार आहे.

शहरात केवळ ऑनलाईन दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाईन आणि ग्राहकांना ती घरपोच उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ही दारू दुकानदारालाच करायची आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश दारू दुकानदारांनी आज दारू दुकानांसमोर पेंडॉल टाकून मोबाईल नंबरचे बॅनर लावले. काहींनी दुकानावर केवळ मोबाईल नंबरचे स्टीकर चिकटवून ठेवले. शहरातील दुकानांसमोरूही दारूसाठी मद्यपींनी गर्दी केली. मोबाईल नंबर घेऊन त्यांनी ऑनलाईन ऑर्डर दिली. परंतु घरपोच दारू मिळणारे मोजकेच ठरले. बहुतांश दुकानदारांना आजचा दिवस ऑनलाईनची प्रक्रिया करण्यात गेला. घरपोच सेवा देण्यासाठी डिलिव्हरी बॉयचीही व्यवस्था त्यांना करावी लागली. त्यामुळे ऑनलाईन ऑर्डर देणाऱ्यांना प्रत्यक्ष घरपोच सेवा ही उद्या शनिवारपासून होईल. दरम्यान, धरमपेठ येथील अंकुर वाईन शॉपमधून थेट काऊंटरवरून दारू विक्री केली जात होती. याची माहिती होताच पोलिसांनी दुकान बंद करायला लावले.आधार कार्डसाठी धावपळदारू खरेदीसाठी मागणी फॉर्म भरणे आवश्यक करण्यात आले आहे. यात हा फॉर्म दुकानदाराकडे असून तो ग्राहकाला भरून द्यायचा आहे. यात ग्राहकाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, दारूचे बॅ्रण्ड, प्रमाण आणि आधार नंबर भरून द्यायचा आहे. परंतु शहरात ऑनलाईन ऑर्डर देणाऱ्यां ग्राहकांनाही काही दुकानदारांनी हा फॉर्म भरायला दिला. तेव्हा अनेकांकडे आधार कार्ड नव्हते. यासाठी त्यांना पुन्हा घरी जाऊन आधार कार्ड घेऊन यावे लागले.दोन दिवसात ४०० आजीवन परवाने, २ हजार अर्ज प्रतीक्षेतनागपुरात ‘लॉकडाऊन’दरम्यान दारू खरेदीसाठी परवाना आवश्यक करण्यात आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात ग्राहकांच्या चकरा वाढल्या आहेत. होम डिलिव्हरीच्या अटीवर दारू विक्री सुरू होण्याचे संकेत मिळताच बुधवारपासूनच परवाना बनवण्यासाठी ग्राहक कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. गुरुवारी २०० लोकांनी आजीवन परवाना बनवला. शुक्रवारी पुन्हा २०० लोकांना परवाने मिळाले. या दोन दिवसातच २ लाखाचा महसूल विभागाला मिळाला. २ हजार अर्ज अजूनही प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदीnagpurनागपूर