शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘शरणस्थान’ रेडलाईट एरियामधील उपेक्षित चिमुकल्यांचा आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:15 IST

आम्ही मूळ केरळचे. एका कामानिमित्त नागपुरात आलो असताना ‘रेडलाईट एरिया’तील वास्तव पाहिल्यावर अंगावर शहारेच आले.

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘रेडलाईट’ भागातील संध्याकाळ संवेदनाहीन जखमांनी भरलेली असते. अशा परिस्थितीत पोटच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी कुणी नसल्याने त्यांच्यासमोरच सर्रास चालणारा ‘तो’ प्रकार, त्या प्रकाराचा मुलांवर होणारा विपरीत परिणाम, त्याच चक्रात त्यांचे बंदिस्त होत असलेले भविष्य.. हे पाहून एका दाम्पत्याने ‘शरणस्थान’ या चॅरीटेबल संस्थेची स्थापना केली. गेल्या १२ वर्षांपासून हे दाम्पत्य येथील चिमुकल्यांना मित्रत्वाचा हात देत आहे. चंदा, बानो, आशा, सानिया, नितीन, प्रकाश अशांसाठी ही संस्था आधारवड ठरली आहे.नागपूरच्या ‘रेडलाईट एरिया’मध्ये दोन हजाराहून अधिक महिला देहविक्र ीचा व्यवसाय करतात. दहा-बाय दहाच्या कोंदट खोलीत हा व्यवसाय चालतो. प्रत्येक रात्री बळी पडणाऱ्या या मातांच्या माथ्यावरचे छप्परही तिच्या मालकीचे नाही. ज्या महिलांना पोटची मुले आहेत त्यांची अवस्था बिकटच. अशा मुलांना या जीवघेण्या चक्रातून बाहेर काढण्याचा पण २००२ मध्ये ईसो डॅनियल आणि लीला ईसो या दाम्पत्याने घेतला. त्यांनी अशा मुलांसोबत साधलेल्या मित्रबंधातून ‘शरणस्थान’ या चॅरीटेबल संस्थेची स्थापना केली. सध्याच्या घडीला त्यांच्याकडे ११४ मुलेमुली आहेत. त्यांच्या राहण्याच्या, जेवण्याचा आणि शिक्षणाचा खर्च हे दाम्पत्य उचलून त्यांच्यामध्ये जगण्याची आशा निर्माण करीत आहेत. येथील महिलांसाठी ही संस्था म्हणजे मोठी आधारवड ठरली आहे.

पत्नीचे डोळे डबडबले अन् सुरू झाला प्रवासडॅनियल यांनी सांगितले, आम्ही मूळ केरळचे. एका कामानिमित्त नागपुरात आलो असताना ‘रेडलाईट एरिया’तील वास्तव पाहिल्यावर अंगावर शहारेच आले. पत्नी लीलाने त्या महिलांना बाहेर काढणे शक्य नसले तरी त्यांच्या मुलांना चांगले जीवन देण्यासाठी प्रयत्न करण्याची गळ घातली आणि शरणस्थानचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर, महिन्याभराची सुटी टाकली. त्यांच्याच वस्तीतील हनुमान मंदिरालगत असलेल्या दोन खोल्या भाड्याने घेतल्या. त्या खोल्यांमध्ये विशेषत: मुलींसाठी शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. सुरवातीला स्थानिकांचा रोष पत्कारावा लागला. भाषेचीही समस्या होती. तुटफूट हिंदीतून संवाद साधला जात होता. हळूहळू त्यांच्यामध्ये आमची मैत्री वाढत होती. तेथील महिलांना आमच्या कार्याची जाणीव व्हायला लागली. मुलींची संख्याही वाढू लागली. मुलांसोबतची मैत्री घट्ट झाली. आता मागे वळून पाहणे कठीण होते, म्हणून नोकरी सोडल्याचे डॅलियन सांगतात.आमचे काम बघून महिलांनीच धरला आग्रहयेथील काही महिलांनी मुले आमच्याचकडे ठेवण्याचा आग्रह धरला. याच परिसरात बंद असलेल्या १४ खोल्यांची इमारत भाड्याने घेतली. २००३ पासून मुलांच्या निवासासोबतच त्यांच्या खाणे, पिणे आणि शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली. यात आम्हाला आमचे जवळचे मित्र, काही देवस्थानच्या संस्था आणि चर्चेस मदत करीत आहेत. आज त्यांच्याच मदतीने ११४ मुलामुलींचा सांभाळ करतो आहे. या मुलांना शक्य तितके या वातावरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असतो, असेही डॅनियन म्हणाले. ४

टॅग्स :Socialसामाजिक