शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

नागपुरात घरावर हल्ले, तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 00:05 IST

जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी रात्रीच्या वेळी गुंडांनी घरावर जाऊन हल्ला केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रविवारी रात्री कळमना आणि पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी रात्रीच्या वेळी गुंडांनी घरावर जाऊन हल्ला केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रविवारी रात्री कळमना आणि पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.कळमनातील आदर्शनगर हनुमान मंदिराजवळ राहणारे महेश ओमराज घरडे (वय २५) यांच्यासोबत आरोपी चेतन ठाकूर गुलशन समुद्रेचा दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. यावेळी घरडे आणि त्यांच्या साथीदाराने मारहाण केली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी रविवारी रात्री ११ च्या सुमारास आरोपी चेतन ठाकूर, गुलशन समुद्रे, आसिफ शेख, पीयूष पारधी, विलास विजेकर आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांनी महेश घरडेच्या घरावर घरावर हल्ला चढवला. त्यांच्या अंगणात ठेवलेल्या दोन वाहनांची तोडफोड केली. आरडाओरड करत घरडे यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून आरोपी आत शिरले. त्यांनी घरडेच्या घरातील शोकेस, खिडक्यांची तावदाने आणि सामानाची तोडफोड केली. एसीही फोडला. घरडे यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. माहिती कळताच कळमनाचे पोलीस उपनिरीक्षक उल्हास राठोड आपल्या सहकाऱ्यांसह तिकडे पोहोचले. त्यांनी घरडे यांना पोलिस ठाण्यात आणले. त्यांची तक्रार नोंदवून उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. काही आरोपींना ताब्यात घेतले. अशीच दुसरी एक घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे २ च्या सुमारास घडली.सुनील रामदास समुद्रे (वय ४८) हे ठक्करग्राम दुर्गामाता मंदिराजवळ राहतात. त्याच वस्तीत राहणारे आरोपी अमोल ऊर्फ चिडिया गावकर, चंचल गावकर, संदेश कनोजिया, अक्षय धामणे, लकी मलिक, राहुल गवतेल यांचा सुनील समुद्रेंसोबत जुना वाद आहे. त्या वादातून आरोपींनी समुद्रेंच्या घरावर सोमवारी पहाटे २ वाजता हल्ला चढवला. दगडफेक करून घराच्या सिमेंट पत्र्यांचे व कुंड्यांचे नुकसान केले. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. समुद्रे यांनी पाचपावली पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदविली. पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहेदोन्ही प्रकरणात अट्टल गुन्हेगारविशेष म्हणजे, या दोन्ही प्रकरणात आरोपी असलेल्यांमध्ये काही अट्टल गुन्हेगारही आहेत. दोन्ही प्रकरणातील आरोपी गुन्ह्याच्या वेळी दारूच्या नशेत टुन्न होते, असेही प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर