शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सुट्या फक्त विद्यार्थ्यांना, शिक्षकांना नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 00:57 IST

कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना सुट्या आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आणि परीक्षेची कामे करावीच लागणार आहेत. शिक्षकांना कुठलीही सुटी नाही, असे शिक्षण अधिकारी (प्रा.) चिंतामण वंजारी यांनी सांगितले.

ठळक मुद्देशिक्षण अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण : शिक्षकांनी कुठलाही संभ्रम बाळगू नये

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना सुट्या आहेत. शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आणि परीक्षेची कामे करावीच लागणार आहेत. शिक्षकांना कुठलीही सुटी नाही, असे शिक्षण अधिकारी (प्रा.) चिंतामण वंजारी यांनी सांगितले.शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनीसुद्धा स्पष्ट निर्देश दिले की, सुट्या केवळ विद्यार्थ्यांना द्याव्यात, शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नाही. कोरोनाच्या विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासनाने शाळांना सुट्या जाहीर केल्या आहेत. महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या देण्यात आल्या. शासनाच्या निर्देशानंतर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपा हद्दीत असणाऱ्या शाळांच्या बाबतीत सुटीचे आदेश काढले. त्यामुळे शहर सीमेवर असलेल्या शाळांच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. कारण या शाळांमध्ये शहरातूनच मोठ्या संख्येने विद्यार्थी जातात. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी बैठक घेऊन नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील शाळा २५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले.शासनाने शाळा बंद ठेवण्यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकात शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कुठलेही स्पष्ट निर्देश नसल्यामुळे शिक्षक संभ्रमात होते. यासंदर्भात सोमवारी अनेक शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे विचारणाही केली. त्यांना शिक्षण विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आले की फक्त विद्यार्थ्यांना सुट्या आहेत, शिक्षकांना नाही. शाळा बंद ठेवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांची प्रतिकार क्षमता कमी असते. शिवाय शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने तो वाढू नये म्हणून विद्यार्थ्यांना सुट्या देण्यात आल्या आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपली कार्यालयीन कामे व परीक्षेची कामे आहेत. ती कामे त्यांनी करावी, असे शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत जायचेच आहे.चिंतामण वंजारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प.

टॅग्स :corona virusकोरोनाTeacherशिक्षक