शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

होळी, धुळवडीचा बंदोबस्त : नागपुरात  २६३१ सीसीटीव्ही कॅमेरांची समाजकंटकांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 00:03 IST

धुळवडीच्या दिवशी चौकाचौकात पोलीस राहणार असून, उपद्रव करू पाहणाऱ्यांवर, समाजकंटकांवर नजर ठेवण्यासाठी २६३१ सीसीटीव्ही कॅमेरऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देठिकठिकाणी नाकेबंदी, अनेकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मद्यधुंद वाहनचालकांवर तसेच हुल्लडबाजांवर पोलिसांनी सोमवारी सायंकाळपासूनच कारवाईला सुरुवात केली आहे. धुळवडीच्या दिवशी चौकाचौकात पोलीस राहणार असून, उपद्रव करू पाहणाऱ्यांवर, समाजकंटकांवर नजर ठेवण्यासाठी २६३१ सीसीटीव्ही कॅमेरऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे.उपराजधानीत होळी धुळवड शांततेत साजरी व्हावी, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.दारूच्या नशेत वाहन चालवून किंवा निष्काळजीपणे वेगात वाहने चालवून काही उपद्रवी मंडळी अपघात घडवून आणतात. त्यामुळे निर्दोष व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागतो. असे होऊ नये म्हणून पोलिसांनी उपराजधानीत चोख बंदोबस्त लावला आहे. सोमवारी सायंकाळपासूनच नागपुरात गस्त वाढवण्यात आली असून, ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. आरडाओरड करणारे, दारूच्या नशेत वाहन चालविणारे, ट्रीपल सिट चालणारे, सिग्नल तोडणारे, हेल्मेट न घालता वाहन चालविणारे तसेच वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई आरंभली होती. उपराजधानीच्या वेगवेगळ्या भागात पोलिसांची कारवाई बघायला मिळत होती. मंगळवारी सकाळपासूनच वाहतूक शाखेचे पोलीस ही कारवाई तीव्र करणार असल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी लोकमतला सांगितले. रस्त्यावर उभे असणारे आणि गल्लीबोळात गस्त घालणारे पोलीस हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नजर ठेवणार आहे. मात्र, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावलेल्या उपराजधानीतील २६३१ सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही पोलीस समाजकंटकांवर नजर ठेवणार आहेत.जबरदस्तीने रंग लावल्यास खबरदार!धुळवडीच्या दिवशी एकमेकांना रंग लावणे स्वाभाविक आहे. मात्र, कोणत्याही महिला-मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध कुणी रंग लावू नये. जबरदस्तीने रंग लावण्याचा अथवा छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिला आहे. अशा प्रकारची कोणतीही तक्रार अथवा सूचना मिळाल्यास तातडीने कडक कारवाई करा, असे निर्देशही डॉ. उपाध्याय यांनी ठाणेदारांना दिले आहेत.

टॅग्स :HoliहोळीNagpur Policeनागपूर पोलीस