शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

नागपुरात पोलिसांच्या उत्कृष्ट बंदोबस्तामुळे होळी धुळवड शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:04 IST

होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने पोलिसांनी उपराजधानीत विशेष बंदोबस्ताचे नियोजन केल्याने दोन्ही दिवस नागपूरकर जनतेने हे सण उत्साहात साजरे केले.

ठळक मुद्देठिकठिकाणी नाकेबंदी : तळीराम, हुल्लडबाजांवर कारवाईचा धडाका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने पोलिसांनी उपराजधानीत विशेष बंदोबस्ताचे नियोजन केल्याने दोन्ही दिवस नागपूरकर जनतेने हे सण उत्साहात साजरे केले.होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने मद्यपान करून अनेक जण रस्त्याने गोंधळ घालत फिरतात. आरडाओरड करतात अन् बेदरकारपणे वाहने चालवून अपघात घडवितात. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना विनाकारण त्रास देतात. महिला-मुलींची छेड काढण्याचेही प्रयत्न करतात. हा सर्व प्रकार लक्षात घेत होळीच्या दिवशी सायंकाळपासूनच पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. रस्त्यारस्त्यावर बॅरिकेटस् लावून अनेकांची तपासणी केली. रस्त्यावरची गस्तही वाढवली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला. दारू च्या नशेत धिंगाणा घालू पाहणारे तळीराम आणि हुल्लडबाजांवर विशेष नजर ठेवण्यात आली. बंदोबस्तासाठी पाच पोलीस उपायुक्त, १० सहायक पोलीस आयुक्त, पोलीस कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत १८०० पोलीस आणि होमगार्डसह एकूण २६०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि शीघ्र कृती दलाचे जवानही सज्ज होते.होळी-धुळवडीच्या निमित्ताने दारू, गांजा तसेच अन्य अमली पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या धंद्यात गुंतलेले मोठ्या प्रमाणात साठेबाजी करतात. पोलिसांनी नाकेबंदी करून तपासणी मोहीम सुरू केली. त्यामुळे हुल्लडबाजांना आवरण्यात पोलिसांना यश आले. संशय येताच वाहनचालक आणि वाहनांना थांबवून पोलीस त्यांच्या तोंडाचा वास घेत होते. वाहनांची तपासणीही करीत होते. परिणामी शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू जप्त करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या या बंदोबस्तामुळे नागपूरकरांनी होळी-धुळवडीचा आनंद घेतला.वाहतूक शाखेची कामगिरीदारूच्या नशेत वाहने चालविणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्याकरीता वाहतूक शाखेने शहरात एकूण ३२ बॅरिकेटस् पॉर्इंट लावले होते. त्याअंतर्गत ८३९ मद्यपि चालकांविरुद्ध तर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४६४८ चालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. त्यात विना हेल्मेटचे १९०, ट्रिपल सीट ७७, सिग्नल तोडणारे ४५, चुकीच्या दिशेने (राँग साईड) वाहन चालविणाऱ्या ७१, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्या १२ चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. बंदोबस्ताच्या उत्कृष्ट नियोजनामुळे शहरात मोठे अपघात घडले नाही.सर्व श्रेय नागरिकांनापोलीस नेहमीच चांगले कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जोपर्यंत नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत पोलिसांचे प्रयत्न यशस्वी होत नाही. यावेळी पोलिसांच्या नियोजनाला नागरिकांनी सहकार्य केले. त्यामुळे होळी धुळवडीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता आला.डॉ. के. व्यंकटेशमपोलीस आयुक्त, नागपूर

टॅग्स :Holi 2018होळी २०१८nagpurनागपूर