शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

नागपुरात सर्वत्र होळी दहन ... ‘कॅट’तर्फे चिनी वस्तूंची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 23:19 IST

चिनी वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध लावण्याची मागणी करताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) बुधवारी संत्रा मार्केट, रेल्वे स्टेशनच्या पूर्वीद्वारासमोरील मारवाडी चाळ येथे चिनी वस्तूंची होळी केली.

ठळक मुद्देशहरभर जल्लोष

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : चिनी वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध लावण्याची मागणी करताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) बुधवारी संत्रा मार्केट, रेल्वे स्टेशनच्या पूर्वीद्वारासमोरील मारवाडी चाळ येथे चिनी वस्तूंची होळी केली. व्यापारी देशाचे चौकीदार असून चिनी वस्तूंची विक्री देशात होऊ देणार नाही, असा इशारा ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी येथे दिला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनने दहशतवादी मसूद अजहरची बाजू घेतली. शिवाय पाकिस्तानला मदत करण्याच्या चीनच्या भूमिकेमुळे देशवासीयांचा चीनप्रती असलेला संताप व्यक्त करण्यासाठी देशातील सात कोटी किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॅटच्या आव्हानार्थ देशातील विविध राज्यांमध्ये व्यापारी संघटनांनी १५०० पेक्षा जास्त ठिकाणी चिनी वस्तूंची होळी करून वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा संकल्प केला. भारतात पाकिस्तानद्वारे चालविण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवायांसाठी चीनने पाकिस्तानची मदत बंद करावी, अन्यथा चीनसाठी वैश्विक बाजार असलेल्या भारतात चिनी वस्तूंची विक्री बंद करू, अशा इशारा व्यापाऱ्यांनी दिला. व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा आणि चिनी वस्तूंवर ३०० ते ५०० टक्के आयात शुल्क लावण्याची मागणी करताना व्यापाऱ्यांनी एकजूटतेचे आवाहन केले.एनव्हीसीसीमध्ये दहशतवाद व ऑनलाईन ट्रेडिंगचे दहननाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे बुधवारी चेंबरच्या सिव्हिल लाईन्स येथील प्रांगणात दहशतवाद, चिनी वस्तू आणि ऑनलाईन ट्रेडिंगचे दहन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी हर्षोल्लासात सर्व धर्म, जात, पक्ष आणि वर्गांनी मिळून एक दुसऱ्याला गुलाल लावून होळीचा आनंद लुटला. चेंबरचे अध्यक्ष हेमंत गांधी यांनी व्यापाऱ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. व्यापाऱ्यांनी शासनासोबत उभे राहावे. देशातील सर्व नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा आणि ऑनलाईन व्यापाराची त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. याप्रसंगी चेंबरचे माजी अध्यक्ष कैलासचंद्र अग्रवाल, गोविंदलाल सारडा, राधेश्याम सारडा, हेमंत खुंगर, जगदीश बंग, दीपेन अग्रवाल, मयूर पंचमतिया, प्रकाश मेहाडिया, उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, अश्विन मेहाडिया, फारुखभाई अकबानी, सचिव संजय के. अग्रवाल, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव रामअवतार तोतला, उमेश पटेल, स्वप्निल अहिरकर, राजू माखिजा, सूर्यकांत अग्रवाल, गजानंद गुप्ता, महेशकुमार कुकडेजा, रमेश उमाटे, प्रताप मोटवानी, रमण पैगवार, संतोष काबरा, राजेश ओहरी, सौरभ अग्रवाल, आलोक दास, संजयराज मोढ सराफ, मनीष जेजानी, राजेश मुनियार, शंकर सुगंध, नटवर पटेल, अभिषेक झा उपस्थित होते.या शिवाय शहरभर होळीचे पूजन करून मोठ्या जल्लोषात होळीचे दहन करण्यात आले.

 

टॅग्स :Holiहोळीchinaचीन