शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

होळी आली अन् एसटीच्या प्रवाशांची संख्या रोडावली!

By नरेश डोंगरे | Updated: March 24, 2024 20:49 IST

सोमवारी फेऱ्या कमी : विदर्भातील ट्रॅाफिक मंदावले, मध्य प्रदेशकडे चिक्कार गर्दी.

नागपूर : होळीच्या दिवशी सर्वत्र प्रचंड उत्साह बघायला मिळत असताना विदर्भातील प्रवाशांनी एसटीकडे रविवारी पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक बसगाड्या प्रवाशांअभावी रिकाम्या धावत होत्या. तर, दुसरीकडे मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावर एसटी आणि खासगी बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली.

होळीचे पर्व कुठे दोन, कुठे तीन तर काही ठिकाणी सात दिवस साजरे केले जाते. होलिकोत्सवाच्या पहिल्या दिवशी अर्थात होलिका दहन करण्यापूर्वीपासून रंग लावण्यास सुरूवात होते. लहान मोठे सर्वच उत्साहाने होळीच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी पुढे येत असल्याने सर्वत्र उत्साह ओसंडून वाहताना दिसतो. या दिवशी व्यवसाय, रोजगाराच्या निमित्ताने बाहेरगावी राहणारी मंडळी आपल्या गावाकडे जाण्यासाठी धावपळ करताना दिसतात. मात्र गाव सोडून या दिवशी दुसऱ्या गावाला जाण्याचे बहुतांश जण टाळतात. त्यामुळे की काय, आज नागपूरहून वर्धा, यवतमाळ, अमरावतीकडे जाणाऱ्या, येणाऱ्या अनेक बसेस प्रवाशांअभावी रिकाम्या धावत असल्याचे दिसून येत होते. दुपारपर्यंत किमान १५ ते २० प्रवासी बसमध्ये दिसत होते. मात्र, सायंकाळी पाच वाजेनंतर विदर्भातील विविध मार्गावर एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिकच घसरली होती. बहुतांश बसमध्ये केवळ ५ ते १० प्रवासीच जात, येत असल्याचे दिसत होते.एसटीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शिवनी, बालाघाटकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर स्थानकावरून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. सोमवारी फेऱ्या कमी करणारसोमवारी रंगोत्सव अर्थात धुळवड आहे. या दिवशी बहुतांश मंडळी घर-मित्रपरिवारात राहून मनसोक्त रंग उधळण्याच्या मनस्थितीत असतात. त्याचा परिणाम प्रवासी संख्या घटण्यावर होते. दरवर्षीचा हा अनुभव लक्षात घेता एसटी महामंडळाने यावेळी धुळवडीच्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध मार्गावर बसफेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मार्गावर दर १५ मिनिटांनी बस सोडली जाते, त्या मार्गावर सोमवारी सकाळपासून दर ३० मिनटांनी बस सोडण्यात येईल. दुपारी आणि सायंकाळी ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी दिसेल, त्या मार्गावरच बस चालविण्यात येणार आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर