शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी मंडळनिहाय मेळावे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 19:21 IST

कोरोनाचे सावट असले तरी, शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. बँकेत, तहसील कार्यालयात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण झाले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून मंडळ स्तरावर पीक कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या प्रकरणाचे निपटारे करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मंडळनिहाय पीक कर्ज मेळावे घेण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे सावट असले तरी, शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. बँकेत, तहसील कार्यालयात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण झाले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून मंडळ स्तरावर पीक कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या प्रकरणाचे निपटारे करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मंडळनिहाय पीक कर्ज मेळावे घेण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची बैठक सभापती तापेश्वर वैद्य यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत पीक कर्जाच्या संदर्भात शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींबाबत तक्रारी समितीकडे आल्या. शिवाय ग्रामीण भागात कोरोनाची भीती असल्यामुळे तहसील व बँकेत गर्दी टाळण्यासंदर्भातही समिती सदस्यांनी सूचना केल्या. सरकारने केलेल्या कर्जमाफीची प्रकरणे अजूनही प्रलंबितच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी तहसील कार्यालय, बँक एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या कर्जाच्या प्रकरणांचा निपटारा करणे सोयीचे होणार आहे. त्यासाठी मंडळनिहाय मेळाव्याची संकल्पना सदस्यांनी मांडली असून, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या बैठकीत सभापतींनी शेतकऱ्यां ना पाणथळ जमिनीमध्ये जिप्समचा पुरवठा करावा, अशा सूचना दिल्या आहे. बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा पोहचविण्यात येणार आहे. याच माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध विभागांच्या योजनांची माहिती व तांत्रिक मार्गदर्शनही देण्यात यावे, अशाही सूचना सभापतींनी केल्या. बैठकीला समिती सदस्य प्रीतम कवरे, समीर उमप, सतीश डोंगरे, योगेश देशमुख, मिलिंद सुटे, भोजराज ठवकर, पिंकी कौरती, वृंदा नागपुरे, सुनीता ठाकरे, कृषी उपसंचालक अरविंद उपरीकर, कृषी अधिकारी विपिन लोहोट, पंकज लोखंडे, प्रवीण नागरगोजे, अमित डोंगरे, आर. आर. राठोड उपस्थित होते.बोगस बियाण्यांची विक्री थांबविण्यासाठी निगराणी समितीप्रतिबंधित असलेल्या एचटीबीटीची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून अनाधिकृत कृषी निविष्ठा प्रतिबंध निगराणी समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर विक्री केंद्रामध्ये तक्रारीसंदर्भात टोल फ्री क्रमांक व कृषी अधिकारी, मोहीम अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर नोटीस बोर्डवर लावण्याच्या सूचना दिल्या आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी