शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

नागपुरात होर्डिंग हटविले ; पोलिसात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:46 IST

उच्च न्यायालयाने अवैध होर्डिग विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असतानाही शहरात ठिकठिकाणी सर्रास अवैध होर्डिंग, बॅनर व पोस्टर लावले जात आहे. महापालिकेतील पदाधिकारीच मित्र परिवाराच्या नावाने असे कृ त्य करीत आहेत. सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील प्रमुख चौकात असे होर्डिंग लावण्यात आले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या लकडगंज झोनच्या पथकाने अवैध होर्डिग जप्त केले.

ठळक मुद्देप्रभाव लोकमतचा : लकडगंज झोनची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाने अवैध होर्डिग विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असतानाही शहरात ठिकठिकाणी सर्रास अवैध होर्डिंग, बॅनर व पोस्टर लावले जात आहे. महापालिकेतील पदाधिकारीच मित्र परिवाराच्या नावाने असे कृ त्य करीत आहेत. सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील प्रमुख चौकात असे होर्डिंग लावण्यात आले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या लकडगंज झोनच्या पथकाने अवैध होर्डिग जप्त केले. त्यानतंर संबंधितावर नियमानुसार पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव यांनी याला दुजोरा दिला आहे.अवैध होर्डिंग, बॅनर हटिवण्याची कारवाई नियमित सुरु आहे. रात्रीच्या सुमारास होर्डिंग लावले जाते. याबाबतची सूचना मिळताच अवैध होर्डिंग व पोस्टर जप्त केले जाते. तसेच नियमानुसार पोलिसात तक्रार दाखल केली जाते. जे दोषी असतील त्यांना न्यायालयात हजर व्हावे लागते. शिक्षा व दंड आकारण्याचा निर्णय न्यायालयाकडून घेतला जातो. अवैध होर्डिंग लावण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल. अशी माहिती जयदेव यांनी दिली. गेल्या काही दिवसापूर्वी आमदार कृष्णा खोपडे व विकास कुंभारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले मित्र परिवारातर्फे अवैध होर्डिग लावण्यात आले होते. झोन कार्यालयाने हे होर्डिंग जप्त केले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPoliceपोलिस