शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

नागपुरात  खर्रा, तंबाखू, गुटखा विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 20:44 IST

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला खर्रा, सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला विकणाऱ्या पानटपऱ्यांविरुद्ध अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) शुक्रवारी धडक मोहीम राबवून ३० पानटपऱ्यांवरून ३४,३६० रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला.

ठळक मुद्दे एफडीएची ३० पानटपरीवर कारवाई : अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला खर्रा, सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला विकणाऱ्या पानटपऱ्यांविरुद्ध अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) शुक्रवारी धडक मोहीम राबवून ३० पानटपऱ्यांवरून ३४,३६० रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. या पानटपरींवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत तसेच भारतीय दंड विधानअंतर्गत कारवाई करण्यात आली.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नागपूर कार्यालयाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईसाठी संपूर्ण नागपूर विभागातून एकूण १३ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात येऊन, त्यांची चार पथके तयार करण्यात आली. या पथकाने शहरातील विविध भागातील पानटपरींवर कारवाई केली. एकूण ३० पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली.अन्न व औषध प्रशासन नागपूर कार्यालयातर्फे प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहे. १ एप्रिल २०१९ ते २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत नागपूर कार्यालयातर्फे एकूण १.२३ कोटी रुपये किमतीचा १४,९४२ वजनाचा साठा जप्त केला आहे. कार्यालयातर्फे १४ व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम १६६, २७२ व ३२८ अंतर्गत प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत. तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणारे व साठवणूक करणाऱ्या पेढ्यांना व त्यांच्या गोदामांना सीलबंद करण्यात आले आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक करणे यालासुद्धा महाराष्ट्रात प्रतिबंध आहे. कार्यालयातर्फे १४ वाहने पकडून, ते जप्त करून वाहनांचा परवाना निलंबित करण्यासाठी आरटीओ नागपूरकडे प्रस्ताव पाठविला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थप्रकरणी २१ खटले न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यक्तींविरुद्ध अतिशय गंभीर असून, प्रशासनातर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही प्रशासनातर्फे निरंतर कारवाई सुरू राहणार आहे.गुटखाबंदी प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी जनतेने सहकार्य करावे आणि विशेषत: युवावर्गाने अशा प्रकारचे सेवन करू नये, असे आवाहन सहआयुक्त चंद्रकांत पवार यांनी केले आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागraidधाड