शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रेस्टॉरंट, धाब्यावर दारू रिचवतात अन् धुंदीत गाडी चालवून लोकांना चिरडतात

By नरेश डोंगरे | Updated: June 20, 2024 19:15 IST

- हिट ॲन्ड रन : एक्साईजची अर्थपूर्ण डोळेझाक, कारवाईच्या नावाने नुसतीच खानापूर्ती

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : शहरात असू दे किंवा शहराबाहेर परवाना नसतानाही अनेक रेस्टॉरंट, धाब्यावर बिनधास्त दारू मिळते. तेथे दारू रिचविल्यावर बेदरकारपणे गाडी चालविली जाते. त्यामुळे नंतर हिट ॲन्ड रनचे प्रकार घडतात. शहरात सध्या असे प्रकार वाढले आहेत. कुणाचा जीव जात आहे तर कुुणी वेदना घेऊन जगत आहेत. मात्र, या प्रकारासाठी जबाबदार असलेल्या पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने डोळ्यावर अर्थपूर्ण झापड लावून घेतले आहे. कारवाईच्या नावाखाली ही मंडळी नुसतीच खानापूर्ती करीत असल्याची चर्चा आहे.

शहराच्या आत आणि बाहेरच्या मार्गावर जागोजागी रेस्टॉरंट आणि धाबे वाढले आहेत. त्यातील अनेक ठिकाणी परवाना नसताना दारू उपलब्ध करून दिली जाते किंवा दारू पिण्याची व्यवस्था करून दिली जाते. त्यामुळे अशा ठिकाणी तरुण-तरुणींची मोठी गर्दी दिसून येते. उशिरा रात्रीपर्यंत तेथे यथेच्छ दारू पिल्यानंतर ही मंडळी रेस लावल्यासारखी वाहने चालवितात. त्यामुळे अपघात होतो. त्यानंतर दोष कुणाचा आणि शिक्षा कुणाला, असा प्रकार घडतो. निरपराध व्यक्तींचा जीव जातो. त्यांच्या नातेवाइकांना आयुष्यभर सलेल अशी जखम होते आणि अपघात करणारी बेजबाबदार मंडळी पोलिसांकडून खानापूर्ती झाल्यानंतर काही तासांतच जामिनावर बाहेर येते. अपघात कितीही गंभीर असला तरी अलीकडे त्यात जामीन मिळतो, हे सर्वांना माहिती झाले म्हणून की काय, काही वाहनचालक मुद्दामहून दारूच्या नशेत बेदरकारपणे वाहन चालवितात.

परवाना नसताना कुठे दारू उपलब्ध करून दिली जात असेल किंवा दारू पिण्याची सोय करून दिली जात असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांप्रमाणेच राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. मात्र, ही मंडळी या गंभीर प्रकाराकडे अर्थपूर्ण डोळेझाक करीत असल्याचे जाणवते. या संबंधाने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आमच्या नियमित कारवाया सुरू असतात, असे ते म्हणतात.तरच अपघाताला आळा घालता येईल

सिग्नल बंद असताना आणि सुरू असलेल्या सिग्नलकडून दुसरे वाहनचालक येताना दिसत असूनही दारूच्या नशेत असलेले काही बेदरकार वाहनचालक आपली गाडी पुढे दामटतात. त्यांच्याकडे सहज बघितले तरी ते गाडीतूनच 'क्या देख रहा...' अशी उर्मट विचारणा करून गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करतात. शहरात असे प्रकार जवळपास रोजच घडतात. 'जाऊ द्या, कशाला कटकट करायची', असे स्वत:ला समजावत अनेक वाहनचालक निघून जातात. अशा दारूड्या वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी रात्रीच्या वेळी शहराच्या आत आणि बाहेर, रस्त्यारस्त्यावर ड्रंक न ड्राईव्ह कारवाईच्या धडक मोहिमेची गरज आहे. असे झाले तरच अपघाताला आळा घालता येईल. 

टॅग्स :Accidentअपघात