शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

झिरो माईल्सचे ऐतिहासिक महत्त्व सौंदर्यीकरणात अधोरेखित व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 23:06 IST

Historical significance of Zero Miles संपूर्ण भारताच्या केंद्रस्थानी असणाऱ्या झिरो माईलच्या सौंदर्यीकरणात नागपूरची भव्यता, नागपूरचे स्थळ माहात्म्य आणि नागपूरचा इतिहास ठसठशीतपणे दिसला पाहिजे, अशा पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : संपूर्ण भारताच्या केंद्रस्थानी असणाऱ्या झिरो माईलच्या सौंदर्यीकरणात नागपूरची भव्यता, नागपूरचे स्थळ माहात्म्य आणि नागपूरचा इतिहास ठसठशीतपणे दिसला पाहिजे, अशा पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी दिले.

"प्रत्येक शहराला एक इतिहास असतो. नागपूर शहराचा इतिहास हा प्राचीन आहे. तसाच तो भारताच्या रचनेमध्ये केंद्रस्थानी आहे. त्यामुळे झिरो माईल्सचे सौंदर्यीकरण भारताच्या हृदयस्थानी जोपासले जाईल असे असावे ", असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी फ्रान्सचे वास्तुविशारद नेमण्यात आले आहेत. यासंदर्भातील स्थानिक स्तरावरच्या सर्व मान्यता देण्यात येतील. रस्ता बंद करण्याबाबतच्या प्रश्नावरदेखील विभागीय आयुक्त हस्तक्षेप करून लवकर तोडगा काढतील, असे निर्देश आज पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.

या बैठकीमध्ये सौंदर्यीकरण व विस्तारीकरणामध्ये झिरो माईल्सजवळून जाणाऱ्या रस्त्याची अडचण येत असल्याचे पुढे आले. भवन्स विद्यालयाकडून येणाऱ्या या रस्त्याला बंद केल्यास अधिक जागा मिळू शकते. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. यावर पालकमंत्री राऊत यांनी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून यावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Zero Mileझीरो माईलNitin Rautनितीन राऊत