शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमी ते लेह-लद्दाख आजपासून ऐतिहासिक धम्म पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2023 08:10 IST

Nagpur News बुद्धांचे धम्मचक्र गतिमान करण्याच्या उद्देशाने दीक्षाभूमी ते लेह-लद्दाखदरम्यान धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर : तथागत भगवान गौतम बुद्धांचा समता, बंधुता आणि शांतीचा संदेश जगभर पोहोचावा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी, बुद्धांचे धम्मचक्र गतिमान करण्याच्या उद्देशाने दीक्षाभूमी ते लेह-लद्दाखदरम्यान धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती थायलंडचे मुख्य भन्ते पहरा थेपारीया तीसुथी व गगन मलिक यांनी रवी भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.

वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंतीचे औचित्य साधून गगन मलिक फाउंडेशन आणि आश्रय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र दीक्षाभूमी ते लेह-लद्दाखपर्यंत धम्म पदयात्रेला उद्या, ५ मे रोजी दीक्षाभूमी येथून सुरुवात होणार आहे. वर्धा मार्गावरील उर्वेला कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे दुपारी ३ वाजता श्रामणेर बनविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ६ ते ८ मे असे दोन दिवस सिहोरा कन्हान येथे श्रामणेर प्रशिक्षण झाल्यानंतर जवळपास १०० श्रामणेरांना राजगीर येथे नेण्यात येईल. तेथून वेणुवन आणि वेणुवन ते बुद्धगया, बुद्धगया ते धर्मशाला आणि धर्मशाला येथून धम्म पदयात्रेला सुरुवात होईल. या धम्म पदयात्रेत भारतातील १०० तर थायलंडचे १०० भन्ते सहभागी होतील. ही धम्म पदयात्रा १५ जुलै रोजी लेह-लद्दाख येथे पोहोचेल व तेथे समारोप होईल.

 

दीक्षाभूमी ते धर्मशाला दरम्यानचा श्रामणेर यांचा प्रवास हा बसद्वारे होईल, तर धर्मशाला ते लेह-लद्दाखदरम्यान एक महिन्याची धम्म पदयात्रा राहील. बुद्धगया येथे थायलंड येथील १०० भन्ते व बौद्ध धम्मगुरु पदयात्रेत सामील होतील.

भारतातून जवळपास १०० श्रामणेर बनविण्याचा गगन मलिक फाउंडेशनचा संकल्प आहे. यासाठी थायलंड येथील दहा भन्तेंचे डेलिगेशन नागपुरात दाखल झाले आहे.

पत्रपरिषदेला थायलंडचे भन्ते कंतराथाना, भन्ते रुपेश, भन्ते प्राखंती बरोम, भन्ते थियाछयो, भन्ते प्रार्थनासून, चीतिको भिकू, प्रहरा महाछाटवना यांच्यासह गगन मलिक फाउंडेशनचे नितीन गजभिये, विकास तायडे, प्रकाश कुंभे, स्मिता वाकोडे, गुणवंत सोनटक्के, वर्षा मेश्राम, रवी सवाईथुल, नरेश महाजन व गगन मलिक फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी