शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हा तर दिवंगत साहित्यिकांचा ऐतिहासिक संदर्भग्रंथ : पंकज चांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 21:41 IST

पुण्या-मुंबईकडे त्या भागातील साहित्यिकांच्या तपशीलवार नोंदी ठेवल्या जातात. विदर्भ मात्र अशा प्रसिद्धीबाबत दुबळा राहिला आहे. अशा परिस्थितीत नागपुरात झालेल्या अनेक साहित्यिकांच्या तपशीलवार नोंदी असलेला ‘अक्षरतर्पण’ हा ग्रंथ मोलाची भूमिका बजावणारा आहे. भविष्यात दिवंगत साहित्यिकांचे संदर्भ शोधताना या ग्रंथाचा उलगडा करावा लागेल. त्यामुळे हा ग्रंथ ऐतिहासिक मोलाचा असल्याचे प्रतिपादन कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी केले.

ठळक मुद्दे‘अक्षरतर्पण : संदर्भ कोश’चे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुण्या-मुंबईकडे त्या भागातील साहित्यिकांच्या तपशीलवार नोंदी ठेवल्या जातात. विदर्भ मात्र अशा प्रसिद्धीबाबत दुबळा राहिला आहे. अशा परिस्थितीत नागपुरात झालेल्या अनेक साहित्यिकांच्या तपशीलवार नोंदी असलेला ‘अक्षरतर्पण’ हा ग्रंथ मोलाची भूमिका बजावणारा आहे. भविष्यात दिवंगत साहित्यिकांचे संदर्भ शोधताना या ग्रंथाचा उलगडा करावा लागेल. त्यामुळे हा ग्रंथ ऐतिहासिक मोलाचा असल्याचे प्रतिपादन कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी केले.राज्य मराठी विकास संस्था, मुंबईद्वारा पुरस्कृत व साहित्य विहार संस्थाद्वारा निर्मित ‘अक्षरतर्पण’ या दिवंगत साहित्यिकांच्या संदर्भकोशाच्या दुसऱ्या आवृत्तीचे सोमवारी धनवटे सभागृहात प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी साहित्य विहारच्या अध्यक्षा आशा पांडे, डॉ. प्रज्ञा आपटे, मदन कुळकर्णी, श्यामकांत कुळकर्णी, प्रा. सुरेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. चांदे पुढे म्हणाले, प्रत्येक साहित्यिकांचे वेगळे वैशिष्ट्य असते. कुणाचे अधिक तर कुणाचे कमी ग्रंथ असले तरी गुणवत्तेप्रमाणे त्यांचे मोल असते. अशा प्रतिभावंतांचे जाणे दु:खदायक असते. अनेकदा त्यांच्या रक्ताचे नाते असलेल्या घरच्यांकडूनही त्यांच्याबद्दल पुरेशी माहिती मिळत नाही. त्या दृष्टीने हा संदर्भग्रंथ मौल्यवान आहे. व्यावहारिक पातळीवर अशा माणसांचे विस्मरण होते. अशा माणसांचे स्मरण करणे व त्यांना अमरत्त्व देणे अतिशय महत्त्वाचे काम असून अभ्यासाच्या दृष्टीनेही मोलाचे असल्याचे मत त्यांनी मांडले.डॉ. मदन कुळकर्णी म्हणाले, माणसांना मरण येईल पण ग्रंथ अमर असतात. आज सर्वांना प्रत्येक गोष्ट ताबडतोब हवी असते. मात्र अभ्यासाशिवाय काहीही शक्य नाही. हा ग्रंथ तयार करणे जटील व किचकट काम होते. आता मात्र शाळा-महाविद्यालयाच्या ग्रंथालयी संग्रही ठेवावा असा ग्रंथ तयार झाल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. डॉ. प्रज्ञा आपटे यांनी या संदर्भग्रंथाबाबत माहिती दिली. २००७ साली ही संकल्पना पुढे आली व ११ वर्षानंतर ती पूर्णत्वास आली. काळाच्या पडद्याआड गेलेल्या विदर्भातील लहानमोठ्या ९५ साहित्यिकांचा या दुसऱ्या आवृत्तीत मागोवा घेतला आहे. या केवळ लेखकांच्या कार्यकर्तृत्वाच्या भावपूर्ण आलेख, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून ऐतिहासिक दस्ताऐवज झाला असल्याचे त्या म्हणाल्या. लवकरच याचे ई-बुकही काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा पांडे यांनी हा ग्रंथ तयार करण्यामागची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. माधुरी वाघ यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर