शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट  : जाळलेल्या तरुणीची स्थिती अद्याप नाजूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:02 IST

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या तरुणीची स्थिती अद्यापही चिंताजनक आहे. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या तरुणीची स्थिती अद्यापही चिंताजनक आहे. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी रुग्णालयातर्फे तरुणीच्या स्थितीबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार डॉक्टरांची टीम सतत तिच्या स्थितीवर नजर ठेवून असून उपचार सुरू आहेत.वैद्यकीय अधीक्षक डॉ. नूरुल अमीन, इंटेंसिविस्ट डॉ. शीतल चव्हाण यांच्या नियंत्रणात वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोरे, प्लास्टिक सर्जन डॉ. दर्शन रेवानवार यांची टीम जखमी युवतीवर उपचार करीत आहेत. बुधवारी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, बजाज फाउंडेशन, वर्धाचे संजय भार्गव, नागपूर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्पणा कोल्हे यांनी रुग्णालयात पोहचून पीडित तरुणीच्या आरोग्याची चौकशी केली. पीडितेच्या उपचारासाठी राज्य शासनाकडून चार लाख रुपये रुग्णालयात जमा करण्यात आले आहेत. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार पीडित युवती ४० टक्के जळालेली आहे. गंभीर भाजल्याने तिची श्वसनलिका आणि फुप्फुसांना गंभीर दुखापत झाली आहे. मात्र किती नुकसान झाले, हे अद्याप सांगता येणार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तरुणीचा चेहरा, गळा, डोके, डावा हात आणि छातीवर चांगलेच भाजले असून डोळ््यांवरही जळाल्याच्या जखमा आहेत. श्वसनलिका जळाल्याने तिला कृत्रिम श्वास दिला जात आहे. या घटनेमुळे समाजात तीव्र संतापाची लाट पसरली असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.राकाँपा महिला प्रदेशाध्यक्षांनी घेतली पीडितेची भेटदरम्यान, हिंगणघाटमधील घटनेचा सर्वत्र निषेध केला जात असून राज्यभरात पडसाद उमटले आहेत. बुधवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हिंगणघाट येथे पीडितेच्या आईवडिलांची भेट घेऊन सांत्वन केले. फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरणाची सुनावणी करून आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास त्यांनी पीडित कुटुंबाला दिला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षा अर्चना हरडे, शहराध्यक्षा अलका कामळे, लक्ष्मी सावरकर, जिल्हा उपाध्यक्ष विनोद हरडे, श्रीकांत शिवणकर, योगेश कोठेकर, विशाल खांडेकर, रोशन भिमटे, मेहबूब पठाण, योगेश पर्बत आदी उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिला