शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणा मेट्रो डेपोचे काम वेगाने सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 22:10 IST

पूर्व व पश्चिम मेट्रो कॉरिडोरदरम्यान असलेल्या हिंगणा डेपोचे कार्य ६५ एकरमध्ये वेगात सुरू आहे. यापैकी ३०.१९ एकरचा परिसर हा रोलिंग स्टॉकच्या मेंटेनन्स कार्याकरिता वापरण्यात येणार आहे.

ठळक मुद्देडेपो अंतर्गत विविध महत्त्वाचे विभाग : या मार्गावर प्रवासी सेवेचा शुभारंभ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पूर्व व पश्चिम मेट्रो कॉरिडोरदरम्यान असलेल्या हिंगणा डेपोचे कार्य ६५ एकरमध्ये वेगात सुरू आहे. यापैकी ३०.१९ एकरचा परिसर हा रोलिंग स्टॉकच्या मेंटेनन्स कार्याकरिता वापरण्यात येणार आहे. या मार्गावर २८ जानेवारीला प्रवासी सेवा सुरू झाली आहे, हे विशेष.या डेपोमध्ये रोलिंग स्टॉक विभागाशी संबंधित इमारती असून त्यामध्ये टाइम व सिक्युरिटी कार्यालय, ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्रकल्प, ट्रॅक्शन सबस्टेशन, प्रशासकीय इमारत, ऑक्झिलरी सबस्टेशन, अंडरग्राऊंड ट्रॅक व पंप रूम, मेंटेनन्स इमारत, पीठ व्हील लेंथ, इंजिनिअरिंग ट्रेन युनिट (ईटीयु), आंतरिक प्लॅटफार्म क्लिनिंग तसेच अनलोडिंग प्लॅटफार्मचा समावेश असून या सर्वांचे वेगवेगळे कार्य आहे.टाइम आणि सिक्युरिटी कार्यालय डेपोच्या प्रवेशस्थानी असून निर्माण कार्य प्रगतिपथावर आहे. संपूर्ण डेपोच्या सुरक्षेची जवाबदारी या कार्यालयावर आहे. ऑटोमेटिक कोच वॉशिंग प्रकल्पात रेल्वेची सफाई करण्यात येते. निर्माण कार्य पूर्ण झाले आहे. ट्रॅक्शन सबस्टेशन इमारतीच्या माध्यमातून वीज पुरवठा होतो. राज्य वीज वितरण विभागाकडून प्राप्त होणारा ३३ केव्हीचा (किलो व्होल्ट) वीज पुरवठा २५ केव्हीपर्यंत आणला जातो. ऑक्झिलरी सबस्टेशनचा उपयोग डेपोमधील इमारतीद्वारे एलटी पॅनलच्या माध्यमातून वीज पुरवठ्यासाठी होतो. याचे निर्माण कार्य सुरू आहे. पंप रूम इमारतीचा उपयोग डेपो परिसरात असलेल्या इमारतींना पाणी पुरवठ्यासाठी होणार असून हा विभाग विविध इमारतींच्या फायर लाईनशी जोडलेला आहे.मेंटेनन्स इमारतीचा उपयोग ट्रेनच्या देखरेखीकरिता होणार आहे. तसेच पीठ व्हील लेंथ या इमारतीमध्ये व्हील ओरिएन्टेशन मशीन स्थापित असून या ठिकाणी ट्रेनच्या चाकाची ठराविक कालावधीनंतर चाचणी करण्यात येणार आहे. शिवाय इंजिनिअरिंग ट्रेन युनिटमध्ये (ईटीयु) या इमारतीचा उपयोग ट्रॅक मशीन रिरेलिंग साहित्य ठेवण्याकरिता होणार असून सद्यस्थितीत इमारतीचा उपयोग रोलिंग स्टॉकच्या देखरेखीकरिता केला जातो. अनलोंडिंग प्लॅटफार्मचा उपयोग नवीन ट्रेनला रुळावर उतरविण्याकरिता केला जातो. याशिवाय आंतरिक प्लॅटफार्म क्लिनिंग, स्टेबलिंग लाईन्स व बायोडायजेस्टर इमारतीचे निर्माण कार्य वेगात सुरू आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर