शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

कट्टर हिंदुत्वाच्या संकल्पनेत पंतप्रधान मोदी केवळ एक प्यादे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:22 IST

राष्ट्रीय  स्वयंसेवक संघा(आरएसएस)च्या स्थापनेपासूनचा कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा आजही कायम आहे व वेळोवेळी कृती बदलून त्यावर काम केले जाते. विचारसरणी देशासाठी घातक असून विषमतेला खतपाणी घालणारी आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ एक प्यादे आहेत.

ठळक मुद्देसंघ ही बौद्धिक झोंबी निर्माण करणारी संस्था : हरतोश बल यांचा घणाघात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :राष्ट्रीय  स्वयंसेवक संघा(आरएसएस)च्या स्थापनेपासूनचा कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा आजही कायम आहे व वेळोवेळी कृती बदलून त्यावर काम केले जाते. विचारसरणी देशासाठी घातक असून विषमतेला खतपाणी घालणारी आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ एक प्यादे आहेत. कदाचित भविष्यात त्यांच्यापेक्षा कट्टर व्यक्ती पदावर येईल तेव्हा देशातील संविधानिक संस्था वाचविण्यास वेळही मिळणार नाही. सध्या या संस्था टिकून आहेत व ही संधी आहे. त्यामुळे संघ विचारांपासून वेळीच सावध व्हा, असे आवाहन कॅरावान पत्रिकेचे संपादक हरतोश सिंह बल यांनी केले.राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बहुजन संघर्ष समिती, भारिप, मराठा सेवा संघ, सत्यशोधक समाज, संभाजी ब्रिगेड व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धनवटे नॅशनल कॉलेज येथे आयोजित प्राचार्य या. वा. वडस्कर स्मृती व्याख्यानात हरतोश सिंह बोलत होते. न्यायमूर्ती लोया यांचे संशयास्पद मृत्यू प्रकरण बल यांनीच उघडकीस आणले होते़ त्यांनी संघाच्या भूमिकेवर कडाडून हल्ला केला. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी लिखित ‘बंच आॅफ थॉट’मधील विचारच संघाचे तत्त्वज्ञान आहे़ मुस्लीम व ख्रिश्चन हिंदू राष्टÑाचा भाग नाहीत आणि सिख, बौद्ध व इतर अल्पसंख्यकांना सांप्रदायिक ठरविणे ही संघाची मूळ भावना आहे. मोदी सरकारच्या काळात देशातील मुस्लीम आणि दलितांवरील हल्ले वाढले असून, लोकशाहीच्या संस्थांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. माध्यमांवर दबाव आणि न्यायव्यवस्थेत ढवळाढवळ वाढली. स्वयंसेवी संस्थांना दाबले जात आहे़ स्पष्ट बोलत नसले तरी संघाचा आरक्षणाला विरोध आहे़ महात्मा गांधी मुस्लिमांचे लाड पुरवितात, असे गोळवलकर म्हणायचे़ गांधीजींच्या हत्येत संघाची भूमिका संशयास्पद आहे. संघाने आपली विचारधारा रुजविण्यासाठी सेवेचा बुरखा पांघरला असून, त्या माध्यमातून लोकांना हिंदुत्वाच्या अजेंड्याकडे परिवर्तित करण्याचे काम विविध संस्थांच्या माध्यमातून केले जात आहे. अण्णा हजारे, योगगुरू रामदेवबाबा यांच्या आंदोलनामागेही संघ असल्याचा आरोप करीत संघ ही चर्चेस तयार न होणारे ‘बौद्धिक झोंबी’ निर्माण करणारी संस्था असल्याचे टीकास्त्र बल यांनी सोडले.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व राष्ट्रीय ओबीसी मंचचे संयोजक डॉ़ बबनराव तायवाडे, प्रभारी प्राचार्य पी़ एस़ चंगोले, बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी, प्रा़ विशाखा वडस्कर, मिलिंद पखाले, आऱ एस़ मोटघरे, अ‍ॅड. आकरे प्रामुख्याने उपस्थित होते. 

टॅग्स :nagpurनागपूरHinduहिंदू