शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

बॅरिकेडस् लावून महामार्ग बंद केले जाणार नाहीत : राज्य सरकारची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:24 IST

सीमा तपासणी नाक्यांच्या ठिकाणी बॅरिकेडस् लावून महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. यासंदर्भात प्रधान सचिव (परिवहन) आशिषकुमार सिंग यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले.

ठळक मुद्दे हायकोर्टातील अवमानना याचिका निकाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीमा तपासणी नाक्यांच्या ठिकाणी बॅरिकेडस् लावून महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. यासंदर्भात प्रधान सचिव (परिवहन) आशिषकुमार सिंग यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले.सीमा तपासणी नाक्यांवर ट्रक, ट्रेलर अशा मालवाहू वाहनांचे वजन व मालाची माहिती संकलित करण्यात येते. ही वाहने अडविण्यासाठी महामार्गावर बॅरिकेडस् लावले जातात. परिणामी, मालवाहू वाहनांसोबत कार, मोटरसायकल अशा बिगरमालवाहू वाहनचालकांनाही सीमा तपासणी नाक्यावर थांबावे लागते. त्याचा बिगरमालवाहू वाहनचालकांना प्रचंड त्रास होतो. ही कृती राष्ट्रीय महामार्ग कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय सीमा तपासणी नाक्यांच्या ठिकाणी महामार्गांवर बॅरिकेडस् लावण्यात येऊ नये व बॅरिकेडस् लावायचेच असल्यास ते झिकझॅक पद्धतीने लावावे असे आदेश दिले आहेत. परंतु, त्या आदेशांचे पालन होत नव्हते. परिणामी, सामाजिक कार्यकर्ते परमजितसिंग कलसी यांनी अवमानना याचिका दाखल केली होती. त्यामध्ये राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून बॅरिकेडस्द्वारे महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन सरकारविरुद्धची अवमानना याचिका निकाली काढली. सुरुवातील कलसी यांनी या मुद्यावर जनहित याचिका दाखल केली होती. २०१५ मध्ये न्यायालयाने ती जनहित याचिका निकाली काढताना संबंधित आदेश दिले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. हरनीश गढिया यांनी कामकाज पाहिले.सरकारने उचललेली पावलेउच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी राज्य सरकारने कोणती पावले उचलली याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली. त्यानुसार, ६ ऑक्टोबर २०१५ रोजी परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले. असेच निर्देश २६ नोव्हेंबर २०१८ रोजीही जारी करण्यात आले. तसेच, ३ डिसेंबर २०१८ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले. २ जानेवारी २०१९ रोजी परिवहन आयुक्तांनी विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना सीमा तपासणी नाक्यांना महिन्यातून एकदा भेट देण्याचा व त्याचा अहवाल सदर करण्याचा आदेश दिला. तसेच, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे ठाणे, धुळे व अमरावतीचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhighwayमहामार्ग