शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

राज्यातील महामार्ग बनले मृत्यूचे सापळे, दिवसाला अपघातात सरासरी २४ जणांचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: March 22, 2024 17:53 IST

राज्यात दररोज सरासरी २४ जणांचा महामार्गांवरील अपघातात मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

नागपूर : राज्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्ग चांगले झाले असले तरी वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातांचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. महाराष्ट्रातील या दोन्ही प्रकारच्या महामार्गांवर मागील १४ महिन्यांत १९ हजारांहून अधिक अपघात झाले व त्यात सव्वा दहा हजारांहून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला. राज्यात दररोज सरासरी २४ जणांचा महामार्गांवरील अपघातात मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयात या अपघातांबाबत विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०२३ साली राष्ट्रीय महामार्गावर १० हजार ८५९ अपघात झाले व त्यात ५ हजार ६८१ जणांचे मृत्यू झाले. तर राज्य महामार्गांवर ६ हजार ४० अपघातांत ३ हजार १८१ जणांचे जीव गेले. तर जानेवारी व फेब्रुवारी २०२४ मध्ये राष्ट्रीय महामार्गांवर १ हजार ८१८ अपघातांत ९०० जणांचा बळी गेला व राज्य महामार्गांवरील ९८४ अपघातांमध्ये ५१८ जणांना जीव गमवावा लागला. या १४ महिन्यांच्या कालावधीत १९ हजार ७०१ अपघात झाले व १० हजार २८० नागरिकांचा मृत्यू झाला.बहुतांश अपघात हे वाहनचालकांचा हलगर्जीपणा, भरधाव वेग, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, नशा करुन वाहन चालविणे, नियमांचा भंग करणे या कारणांमुळे झाले.

चार शहरांच्या अंतर्गतच १,४५५ मृत्यूनागपूर , मुंबई, पुणे व छत्रपती संभाजीनगर या चार शहरांच्याअंतर्गत असलेल्या महामार्गांवर १४ महिन्यांच्या कालावधीत ६ हजार ४९७ अपघात झाले. त्यात १ हजार ४५५ जणांचा मृत्यू झाला.

‘कार’ सर्वात धोकादायक

२०१९ ते २०२२ या कालावधीत महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये सर्वात जास्त अपघात कारचे झाले आहेत. या कालावधीत १७ हजार ८०२ कारचे अपघात झाले व त्यात ७ हजार ५१५ जणांचा जीव गेला. ट्रकचे ६ हजार ४५१ अपघात झाला व २ हजार ६३८ जणांचा मृत्यू झाला. तर बसमुळे २ हजार २९५ अपघात झाले व ५६३ जणांना जीव गमवावा लागला.

वर्षनिहाय अपघातवर्ष : अपघात (राष्ट्रीय महामार्ग) : मृत्यू (राष्ट्रीय महामार्ग) : अपघात (राज्य महामार्ग) : मृत्यू (राज्य महामार्ग)२०१९ : ८,३६० : ३,७९९ : ७,२१४ : ३,३४४२०२० : ६,५०१ : ३,५२८ :५,५१८ : २,९७१२०२१ : ७,५०१ : ४,०८० : ६,३२८ : ३,४११२०२२ : ९,४१७ : ४,९२३ : ६,९०२ : ३,८२०२०२३ : १०,८५९ : ५,६८१ : ६,०४० : ३,१८१२०२४ ( फेब्रुवारीपर्यंत ) : १,८१८ : ९०० : ९८४ : ५१८

शहरनिहाय अपघात (जानेवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४)शहर : अपघात : मृत्यूनागपूर : १,४२६ : ६८२पुणे : १,४७८ : ४१३मुंबई : २,८९२ : ४२६छ.संभाजीनगर : ७०८ : २३४

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर