शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजमार्ग प्राधिकरणाची १ कोटी ३९ लाखांची हमी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:51 IST

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी आणि कागदपत्रांचा वापर करून एका आरोपीने प्राधिकरणाची १ कोटी, ३९ लाखांची बँक हमी रद्द करवून घेतल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, २० जून २०१६ मध्ये घडलेल्या या घटनेची माहिती तब्बल दोन वर्षांनंतर पुढे आली. त्यानंतर प्रकल्प संचालक अभिजित प्रल्हादराव जिचकार (वय ४७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देबनावट पत्रामुळे उडाली खळबळ : अंबाझरीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी आणि कागदपत्रांचा वापर करून एका आरोपीने प्राधिकरणाची १ कोटी, ३९ लाखांची बँक हमी रद्द करवून घेतल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, २० जून २०१६ मध्ये घडलेल्या या घटनेची माहिती तब्बल दोन वर्षांनंतर पुढे आली. त्यानंतर प्रकल्प संचालक अभिजित प्रल्हादराव जिचकार (वय ४७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.जिचकार यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात आरोपीने २० जानेवारी २०१६ ला प्रकल्प संचालक, पी यू-२, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाचे बनावट लेटर तयार करून करारासंबंधाने ते पत्र बँक आॅफ इंडियाच्या ओपेरा शाखा मुंबईला पाठवले. या पत्रात आरोपीने प्राधिकरणाशी झालेल्या १ कोटी, ३९ लाख, १७ हजारांची बँक हमी रद्द करण्याची विनंती केली. त्यावर प्रकल्प संचालक अभिजित जिचकार यांची बनावट स्वाक्षरी आरोपीने केली. त्या पत्राच्या आधारे बँकेने प्राधिकरणाची हमी रद्द केली. दोन वर्षे झाल्यानंतर आठ दिवसांपूर्वी या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर जिचकार यांनी गेल्या आठवड्यात अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार भीमराव खंदाळे यांंनी आपल्या सहकाºयांकडून कागदपत्रांची सविस्तर चौकशी करून घेतली. त्यानंतर मंगळवारी पोलीस उपनिरीक्षक एन. डी. शेख यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.---घरभेदीकडूनच गुन्हा !हा गुन्हा प्राधिकरणाशी संबंधित असलेल्याकडूनच झाला असावा, असा संशय आहे. कोणत्या बँकेशी करार आहे, त्यात कुणाशी हमी रद्द करण्यासंबंधीचा पत्रव्यवहार करावा लागतो, हे केवळ प्राधिकरणाशी संबंधित व्यक्तीलाच माहीत असू शकते. त्यामुळे संबंधित व्यक्तीच या प्रकरणात आरोपी असावा, असा पोलिसांचा कयास आहे. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या रकमेची बँक हमी रद्द करण्यापूर्वी बँक अधिकाºयांनी प्रकल्प संचालक किंवा अन्य वरिष्ठांशी चर्चा का केली नाही, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी अंबाझरी पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना केले जाणार असल्याचे ठाणेदार खंदाळे यांनी लोकमतला सांगितले.---

टॅग्स :Crimeगुन्हाfraudधोकेबाजी