शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव कुंटे यांच्यासह ९२ जणांना न्यायालय अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 21:42 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी तंत्रनिकेतन व्याख्याता नियुक्तीमधील गैरप्रकाराची गंभीर दखल घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ व ९२ वादग्रस्त व्याख्यात्यांना अवमानना नोटीस बजावली.

ठळक मुद्देतंत्रनिकेतन व्याख्यात्यांनी केली हायकोर्टाची दिशाभूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी तंत्रनिकेतन व्याख्याता नियुक्तीमधील गैरप्रकाराची गंभीर दखल घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ व ९२ वादग्रस्त व्याख्यात्यांना अवमानना नोटीस बजावली.यासंदर्भात संगीता भोयर व इतर ३२ उमेदवारांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. त्यांनी २०१३ मध्ये शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील व्याख्याता पदभरतीसाठी झालेली एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. परंतु, सचिन ढवळे व इतर अस्थायी व्याख्यात्यांनी उच्च न्यायालयातून अवैधपणे सेवा नियमितीकरणाचा आदेश मिळविल्यामुळे याचिकाकर्त्यांना नियुक्तीपासून वंचित रहावे लागले असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ढवळे व इतरांनी सेवा नियमितीकरणाचा आदेश मिळविण्यासाठी उच्च न्यायालयाची दिशाभूल केली. सात वर्षांपासून अस्थायी व्याख्याता म्हणून कार्यरत असून एमपीएससीने गेल्या दहा वर्षांत एकही परीक्षा घेतली नाही. त्यामुळे सेवेत कायम करण्यात यावे अशी विनंती त्यांनी केली होती. १९ आॅक्टोबर २०१३ रोजी न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करून सरकारला त्यासंदर्भात आदेश दिले. त्या आधारावर नंतर ५३० अस्थायी व्याख्यात्यांना सेवेत कायम करण्यात आले. सरकारने प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या डॉ. प्रवीण गेडाम समितीने २ नोव्हेंबर २०१७ रोजी अहवाल सादर करून २००७ व २००९ मधील एमपीएससी परीक्षेची माहिती न्यायालयापासून लपवून ठेवण्यात आल्याचे सांगितले. त्यावरून ढवळे व इतरांनी न्यायालयाला फसविल्याचे सिद्ध होते. परिणामी, दोषी व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी व गैरप्रकार करून मिळविलेला उच्च न्यायालयाचा १९ आॅक्टोबर २०१३ रोजीचा निर्णय रद्द करण्यात यावा असे अवमानना याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. न्यायालयाने प्रतिवादींना यावर उत्तर सादर करण्यासाठी ३ आॅगस्टपर्यंत वेळ दिला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर व अ‍ॅड. रोहण मालविया यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयEducationशिक्षण