शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह पोलीस भरती लेखी परीक्षेत हायटेक कॉपी

By योगेश पांडे | Updated: September 30, 2024 17:53 IST

‘माईक स्पाय’चा वापर, बाहेरून सांगितली जात होती उत्तरे : कॉपीबहाद्दर आरोपीला अटक

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारागृह पोलीस भरती लेखी परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होणार नाही असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात एका उमेदवाराने चक्क हायटेक कॉपी केली. ‘माईक स्पाय’ या डिव्हाईसच्या माध्यमातून पेपर सोडविणाऱ्या कॉपीबहाद्दराला पोलिसांनी अटक केली आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

राज्यभरात पोलीस भरती सुरु असून सध्या लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेत कुणीही कॉपी करु नये म्हणून दक्षता घेण्यात येत आहे. ‘स्पाय माईक’च्या मदतीने कॉपी करुन पेपर सोडवत असल्याची कुणकुण पोलीस अधिकाऱ्यांना होती. मानकापूर येथील क्रीडा संकुलात कारागृह शिपाई पद भरती २०२२-२३ साठी लेखी चाचणी परीक्षा घेतली जात आहे. २९ सप्टेंंबरला दुपारी चाचणी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत दुपारी ३.२० वाजताच्या सुमारास ‘चेस्ट’ क्रमांक २५०३७ असलेला आरोपी उमेदवार किसन जोनवाल (बाभुलगाव, वैजापुर, छत्रपती संभाजीनगर) याने परीक्षा उतीर्ण होण्याकरिता बाहेरील त्याचा साथीदार आरोपी जीवन काकरवाल (२९, रघुनाथपूर वाडी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर) याच्यासोबत कट रचला. ते परीक्षेतील प्रश्न ‘माईक स्पाय’ अशा ईलेक्ट्रानिक डिव्हाईसच्या वापराने सोडवत असल्याचे दिसून आले. जीवन बाहेरून किसनला उत्तरे सांगत होता. मात्र पोलिसांनी किसनला रंगेहाथ पकडले. मानकापूर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (२), (४), ६१(२), (ए), २२३ सहकलम ६६ (ड) आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसनचा साथीदार जीवन काकरवाल फरार झाला आहे.

केंद्रावरील तपासणीत दुर्लक्ष ?परीक्षा केंद्रावर उमेदवारांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र तरीदेखील किसन हा स्पाय माईक घेऊन परीक्षा केंद्रात पोहोचला. त्याने काही प्रश्नांची उत्तरदेखील त्यामाध्यमातून लिहीली होती. हा प्रकार सुरू असताना केंद्रावरील पर्यवेक्षकांच्या नजरेत हा प्रकार आला नाही का व तपासणीत दुर्लक्ष कसे काय झाले असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणnagpurनागपूर