शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वेतनवाढ उच्चस्तरीय समितीच्या अहवालाची केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एस. टी. कर्मचाऱयांच्या वेतनवाढीसंदर्भात उच्चस्तरीय समितीने दिलेला अहवाल एस. टी. कर्मचाऱयांच्या आयोग कृती समितीने फेटाळला आहे. या समितीच्या अहवालाची गुरुवारी घाट रोड, इमामवाडा, गणेशपेठ, वर्धमाननगर, मध्यवर्ती कार्यशाळा हिंगणा येथे होळी करण्यात आली.आॅक्टोबर महिन्यात एस. टी. कर्मचाऱयांनी संप पुकारल्यानंतर उच्च न्यायालयाने या संदर्भात उच्चस्तरीय समिती नेमून अहवाल ...

ठळक मुद्देमहाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कॉंग्रेसचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एस. टी. कर्मचाऱयांच्या वेतनवाढीसंदर्भात उच्चस्तरीय समितीने दिलेला अहवाल एस. टी. कर्मचाऱयांच्या आयोग कृती समितीने फेटाळला आहे. या समितीच्या अहवालाची गुरुवारी घाट रोड, इमामवाडा, गणेशपेठ, वर्धमाननगर, मध्यवर्ती कार्यशाळा हिंगणा येथे होळी करण्यात आली.आॅक्टोबर महिन्यात एस. टी. कर्मचाऱयांनी संप पुकारल्यानंतर उच्च न्यायालयाने या संदर्भात उच्चस्तरीय समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. वेतनवाढ उच्चस्तरीय समितीत राज्य शासनाच्या प्रधान सचिव तसेच आयुक्तांसारख्या अधिकाऱयांचा समावेश होता. हा अहवाल तयार करताना संपकर्त्या कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे सौजन्य समितीने दाखविले नाही. अहवालात समितीने कर्मचाऱयांच्या वेतनवाढीचा अहवाल देण्याऐवजी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीचे विवरण केले. अहवालात भत्ते वाढविण्याऐवजी कमी केले. त्यामुळे गुरुवारी नागपुरात या अहवालाची होळी करण्यात आली. संघटनेचे प्रादेशिक सचिव अरुण भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशपेठ बसस्थानकात संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष प्रवीण घुगे, दीपक बागेश्वर यांच्या नेतृत्वात, इमामवाडा आगारात अरुण बनसोड यांच्या नेतृत्वात, वर्धमाननगर आगारात सचिव झोडे तसेच हिंगणा येथील मध्यवर्ती कार्यशाळेत सुभाष गोजे, प्रशांत निवल, मनोज शेंडे यांच्या नेतृत्वात कामगारांनी या अहवालाची होळी करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपnagpurनागपूर