शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वारांगनांच्या अधिकारांची हायकोर्टाकडून दखल, गंगा-जमुना प्रकरण आता जनहित याचिकेत, वैधतेला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 05:48 IST

High Court : अधिसूचित नसलेल्या परिसरामध्ये देहविक्री करणे गुन्हा नाही. त्यामुळे पीडित महिला गंगा-जमुना वस्तीमध्ये राहून इतर ठिकाणी देहविक्री करू शकतात.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी गंगा-जमुना वस्ती आणि तेथे देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासंदर्भातील प्रकरण जनहित याचिकेत परिवर्तित केले.

यासंदर्भात व्यावसायिक मुकेश शाहू यांनी रिट याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्या न्यायालयाने याचिकेतील मुद्द्यांवर व्यापक विचार होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आणि याचिकाकर्त्याला १७ नोव्हेंबरपर्यंत नियमानुसार जनहित याचिका दाखल करण्यास सांगितले. पोलीस आयुक्तांनी २५ ऑगस्ट २०२१ रोजी अधिसूचना जारी करून गंगा-जमुना वस्तीमध्ये देहविक्री व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. याचिकाकर्त्याने या अधिसूचनेच्या वैधतेला आव्हान दिले आहे. 

अधिसूचित नसलेल्या परिसरामध्ये देहविक्री करणे गुन्हा नाही. त्यामुळे पीडित महिला गंगा-जमुना वस्तीमध्ये राहून इतर ठिकाणी देहविक्री करू शकतात. त्यामुळे गंगा-जमुना येथील त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून गुन्हे नोंदविता येणार नाहीत. गंगा-जमुना वस्ती नको असेल तर, येथील महिलांचे दुसरीकडे पुनर्वसन करण्यात यावे. परंतु, वस्ती सील करून महिलांचे मूलभूत अधिकार वेशीला टांगू नयेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

गंगा-जमुना परिसर सार्वजनिक स्थळगंगा-जमुनाचा परिसर सार्वजनिक ठिकाण घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या भागात आता कायद्यानुसार देहविक्रयाचे अड्डे चालविता येणार नाहीत. गंगा-जमुनात शाळा आहे, मंदिरही आणि दर्गाही आहे. त्यामुळे कायद्याचा विचार केल्यास तेथे कुंटणखाने चालविता येत नाहीत; मात्र, अनेक वर्षांपासून बिनबोभाट कुंटणखाने चालविले जात आहेत. पोलीस आयुक्तांनी कठोर भूमिका घेत ते बंद करण्यासाठी पावले उचलली आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय