हायकोर्ट : कथित पत्रकाराची शिक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 09:41 PM2019-02-21T21:41:28+5:302019-02-21T21:42:28+5:30

व्यवसायाने पत्रकार असल्याचे सांगून खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीची दोन वर्षे कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कायम ठेवली. तसेच, या शिक्षेविरुद्ध आरोपीने दाखल केलेली रिव्हिजन याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.

High Court: The sentence of the alleged journalist continues | हायकोर्ट : कथित पत्रकाराची शिक्षा कायम

हायकोर्ट : कथित पत्रकाराची शिक्षा कायम

Next
ठळक मुद्देरिव्हिजन याचिका फेटाळून लावली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यवसायाने पत्रकार असल्याचे सांगून खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीची दोन वर्षे कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कायम ठेवली. तसेच, या शिक्षेविरुद्ध आरोपीने दाखल केलेली रिव्हिजन याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.
शरद बाळकृष्ण देवतळे (५३) असे आरोपीचे नाव असून तो सेवाग्राम, जि. वर्धा येथील रहिवासी आहे. प्रकरणातील माहितीनुसार, फिर्यादी सोनबा भैसारे यांनी १९९४-९५ मध्ये स्वत:च्या जमिनीवर ले-आऊट पाडून भूखंड विकले. ग्राहकांनी त्या भूखंडांवर घरे बांधली. दरम्यान, आरोपीने ले-आऊट अवैध असल्याच्या बातम्या छापण्याची व उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची धमकी देऊन भैसारे यांना ५० हजार रुपयाची खंडणी मागितली. भैसारे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर २८ जुलै २००० रोजी सापळा रचण्यात आला व आरोपीला १० हजार रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली.
या प्रकरणात प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपीने सत्र न्यायालयात अपील दाखल केले असता, सत्र न्यायालयाने दोष व दंड कायम ठेवून केवळ कारावासाची शिक्षा दोन वर्षे केली. परिणामी, आरोपीने उच्च न्यायालयात रिव्हिजन याचिका दाखल केली होती. फिर्यादीतर्फे अ‍ॅड. महेश राय यांनी कामकाज पाहिले.

Web Title: High Court: The sentence of the alleged journalist continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.