शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

आर्थिक फसवणूक करणाऱ्या चौघांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:04 IST

चेन मार्के टिंगच्या नावाखाली ग्राहकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या चार आरोपींची स्वत:ला आरोपमुक्त करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली.

ठळक मुद्देआरोपमुक्त करण्याची विनंती फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चेन मार्के टिंगच्या नावाखाली ग्राहकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या चार आरोपींची स्वत:ला आरोपमुक्त करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. तसेच, प्रकरणातील तथ्ये लक्षात घेता चारही आरोपींविरुद्ध खटला चालविणे आवश्यक आहे असे निरीक्षण नोंदवले. या निर्णयामुळे आरोपींना जोरदार दणका बसला. न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.आरोपींमध्ये पुणे येथील कृष्णकांत छगनलाल चांडक (४२), मनोज छगनलाल चांडक (४४), दाभा (नागपूर) येथील विवेक विजयकुमार ठाकरे (५०) व योगेश विजयकुमार ठाकरे (४७) यांचा समावेश आहे. कृष्णकांत व मनोज हे वादग्रस्त केयर टेक मार्केटिंग कंपनीचे संचालक व व्यवस्थापकीय संचालक आहेत. या कंपनीमार्फत किराणा सामान विकण्याची योजना राबवली जात होती. इच्छुक व्यक्तीला ७१ हजार ५६९ रुपये जमा केल्यानंतर योजनेचे सदस्य केले जात होते. त्यानंतर सदस्य व्यक्तीस नागपुरातील तीन किराणा दुकानातून सवलतीच्या दरात किराणा खरेदी करता येत होता. तसेच, त्याला दर महिन्याला १२ हजार रुपये कमिशन व ३१ सदस्यांचा पिरॅमिड पूर्ण केल्यानंतर २५ टक्के रॉयल्टी देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते.वाडी येथील फिर्यादी अशोक रहाटे हे या योजनेचे सदस्य झाले होते. परंतु, त्यांना केवळ १८ हजार रुपयेच परत मिळाले. कंपनीने आश्वासन पूर्ण केले नाही. परिणामी, त्यांनी २३ नोव्हेंबर २००३ रोजी वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६ यासह एमपीआयडी कायदा व आरबीआय कायद्यांतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला असता कंपनीने तब्बल १५ हजार ५३५ ग्राहकांकडून ४ कोटी ३ लाख ७५ हजार ४६५ रुपये स्वीकारल्याचे व ती रक्कम ग्राहकांना परत करण्यात आली नसल्याचे पुढे आले.वरील चार आरोपींनी स्वत:ला आरोपमुक्त करून घेण्यासाठी सुरुवातीला एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. २१ एप्रिल २०१८ रोजी सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता आरोपींचा अर्ज खारीज करून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय