शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : उठाबशा काढायला लावण्यासारख्या शिक्षा बेकायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 01:48 IST

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना उठाबशा काढायला लावणे, ‘मी देश, समाज व कुटुंबाचा शत्रू आहे’ असे लिहिलेला फलक हातात देऊन फोटो काढणे अशाप्रकारच्या मानहानीजनक कारवाया करणे शहर पोलिसांना महागात पडले.

ठळक मुद्देमानवाधिकाराची पायमल्ली करणाऱ्या कारवाईवरून पोलिसांना फटकारले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना उठाबशा काढायला लावणे, ‘मी देश, समाज व कुटुंबाचा शत्रू आहे’ असे लिहिलेला फलक हातात देऊन फोटो काढणे अशाप्रकारच्या मानहानीजनक कारवाया करणे शहर पोलिसांना महागात पडले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी ही बाब गंभीरतेने घेऊन पोलिसांना फटकारले. या कारवाया बेकायदेशीर, तसेच मानवाधिकार आणि घटनात्मक अधिकारांची पायमल्ली करणाऱ्या आहेत, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.कोरोनाचे संक्रमण वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचे कठोरतेने पालन करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांना कायद्यामध्ये पुरेसे अधिकार देण्यात आले आहेत. पोलीस ते अधिकार वापरूनही लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करू शकतात. बेकायदेशीर पद्धतीने वागणाऱ्या पोलिसांनी आपला समाज कायद्याद्वारे नियंत्रित आणि सुधारलेला आहे हे लक्षात घ्यावे. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीतदेखील कठोर कारवाई करायची झाली तरी, ती कारवाई कायदेशीरच असली पाहिजे. अशा कारवाईकरिता मानवी सन्मान व मानवाधिकारांसोबत तडजोड केली जाऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अधिकाराखालील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करावी आणि पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची खात्री करावी. तसेच, यापुढे असे प्रकार घडल्यास संबंधित क्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरावे, असेही न्यायालय आदेशात म्हणाले. याशिवाय न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यासंदर्भात २१ मेपर्यंत सविस्तर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याविषयी रामदासपेठ येथील संदीप नायर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अनिल कमाले तर, सरकारतर्फे अ‍ॅड. केतकी जोशी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस