शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : सिंचन गैरव्यवहारावरील याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:43 IST

अकोला जिल्ह्यातील शहापूर सिंचन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा व जमिनीवरील फळझाडांचा मोबदला ठरविताना झालेल्या गैरव्यवहारासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून गैरव्यवहाराची चौकशी करण्यात आली असून चौकशी अहवाल न्यायालयाने रेकॉर्डवर घेतलेला आहे.

ठळक मुद्देशहापूर सिंचन प्रकल्पाशी संबंधित प्रकरण

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : अकोला जिल्ह्यातील शहापूर सिंचन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा व जमिनीवरील फळझाडांचा मोबदला ठरविताना झालेल्या गैरव्यवहारासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून गैरव्यवहाराची चौकशी करण्यात आली असून चौकशी अहवाल न्यायालयाने रेकॉर्डवर घेतलेला आहे.आकोट येथील माहिती अधिकार कार्यकर्ते मोहन पांडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. २००९-१० मध्ये या प्रकल्पासाठी वडाळी देशमुख गावातील अण्णपूर्णा डोरले, कमला बोडखे, पार्वती बोडखे, विजय देशमुख, अरुण आकोटकर, रामचंद्र आकोटकर, सुधीर आकोटकर व विलास आकोटकर या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. कृषी अधिकाऱ्यांनी जमिनीवरील फळझाडांचे मूल्यांकन करून ११ मे २०१२ रोजी तर, भूसंपादन अधिकाऱ्याने जमिनीचे मूल्यांकन करून १६ जुलै २०१४ रोजी अहवाल सादर केला. त्यावरून फळझाडांसाठी एकूण २ कोटी ५३ लाख ६३१ रुपये तर, जमिनीसाठी एकूण ३ कोटी १८ लाख १५ हजार ४८० रुपये भरपाई निश्चित करण्यात आली. ही भरपाई अवास्तव असून त्यामुळे सार्वजनिक निधीचे नुकसान झाले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचा आदेश दिला होता. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर मोबदल्यात गैरव्यवहार झाल्याचा अहवाल दिला होता. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर काहीच कारवाई केली नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प